Ravindra Jadeja Injury : रवींद्र जडेजा 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषकसाठी BCCI ने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा भारतीय संघाचा भाग असणार नाही. भारतीय अष्टपैलू खेळाडूला गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी T20 विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले आहे. आशिया चषक स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा भारतीय संघाचा भाग होता, मात्र दुखापतीमुळे तो खेळू शकला नाही.
आशिया कप मध्ये रवींद्र जडेजा दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, पण एका चुकीमुळे त्याची सर्व मेहनत वाया गेली आणि तो विश्वचषकासह अनेक मालिकांमधून बाहेर गेला. विश्वचषक संघाची घोषणा झाल्यानंतर रवींद्र जडेजाने पहिल्यांदाच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो क्रॅचच्या सहाय्याने चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचा फोटो शेअर करत रवींद्र जडेजाने कॅप्शन लिहिले की, "एका वेळी एक पाऊल".
भारतीय संघ दुबईमध्ये ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होता. तेथे रविंद्र जडेजाला एक वॉटर बेस ट्रेनिंग अॅक्टिव्हिटी करण्यास सांगण्यात आले होते. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रविंद्र जडेजाला या धाडसी ट्रेनिंग सेशनमध्ये एका स्की बोर्डवर स्वतःचा तोल सावरायचा होता. हा धाडसी क्रीडा प्रकार बीसीसीआयच्या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये नाहीये. जडेजाला हे धाडस करण्याची कोणतीच गरज नव्हती. तो स्की-बोर्डवरून घसरला आणि त्याचा गुडघा दुखावला. दुखापत एवढी गंभीर होती की त्याला त्वरित शस्त्रक्रिया करावी लागली.
रवींद्र जडेजा 2021 च्या टी-20 विश्वचषकापासून अनेकदा जखमी झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो बाहेर पडला होता. त्याचवेळी आयपीएल 2022 मध्येही त्याला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.