T20 World Cup 2021 Schedule : ठरलं! या मैदानात रंगणार सामने

स्पर्धा जरी युएई आणि ओमनमध्ये रंगणार असलीय तरी त्याचे यजमानपद हे भारताकडेच राहिल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
ICC T20 World Cup 2020 Full Schedule Announced
ICC T20 World Cup 2020 Full Schedule AnnouncedFile Photo

T20 World Cup 2021 Schedule: टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात बीसीसीआयच्या वृत्तावर आता आयसीसीने शिक्कामोर्तब केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा UAE आणि Oman याठिकाणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. 17 ऑक्टोबरला स्पर्धेला सुरुवात होणार असून 14 नोव्हेंबरला फायनल खेळवण्यात येणार आहे. स्पर्धा जरी युएई आणि ओमनमध्ये रंगणार असलीय तरी त्याचे यजमानपद हे भारताकडेच राहिल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.

ICC T20 World Cup 2020 Full Schedule Announced
इंग्लंडमध्ये ODI साठी 80 टक्के प्रेक्षकांना एन्ट्री; पण...

या चार स्टेडियमवर रंगणार सामने

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्व सामने युएई आणि ओमन येथील 4 स्टेडियमवर खेळवण्यात येतील. यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, अबू धाबी येथील शेख जायद स्टेडियम, शारजहा आणि ओमन क्रिकेट अकादमी ग्राउंड या स्टेडियमचा समावेश आहे.

भारतात स्पर्धा होत नसल्यामुळे ICC चा हिरमोड

आयसीसीचे कार्यवाहू प्रमुख ज्योप एलार्डिस म्हणाले की, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा सुरक्षित पार पाडणे याला आम्ही प्राधान्य देणार आहोत. स्पर्धा भारतात होत नसल्यामुळे निराश आहोत, असा उल्लेखही त्यांनी केलाय. ही स्पर्धा आता बीसीसीआय, अमीरात क्रिकेट बोर्ड आणि ओमान क्रिकेट बोर्डाच्या सहकाऱ्याने पार पाडू. क्रिकेट चाहत्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करु, असे ते म्हणाले.

ICC T20 World Cup 2020 Full Schedule Announced
Tokyo Olympics : सिमोना हालेप ऑलिम्पिक स्पर्धेलाही मुकणार

टी-20 वर्ल्ड कपसंदर्भात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली काय म्हणालेत

पुरुष टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमनमध्ये घेण्यासाठी बीसीसीआय उत्सुक आहे. स्पर्धा भारतात पार पडली असती तर आनंद झाला असता. पण कोरोनाच्या परिस्थितीमुळे स्पर्धा भारतात घेणं शक्य नाही. त्यामुळेच स्पर्धा भारताबाहेर घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. बीसीसीआयने स्पर्धेची सर्व तयारी केली आहे, असेही सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले होते.

कोरोनामुळे रद्द झाली होती IPL स्पर्धा

देशात कोरोनाची परिस्थिती बिकट असल्यामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली होती. ही स्पर्धा देखील युएईत पार पडणार आहे. वर्ल्ड कप अगोदर उर्वरित सामने घेण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील असून वर्ल्ड कपच्या शेड्युलनंतर आयपीएल स्पर्धेचे शेड्युलही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com