Thomas Cup जिंकल्यावर तापसी पन्नूने बॉयफ्रेंडचे केले तोंडभरुन कौतुक

अभिनेत्री तापसी पन्नूने थॉमस कप विजेत्या संघाचे कोच बोला दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
aapsee Pannu Congratulates Partner Mathias Boe After India’s Thomas Cup Win
aapsee Pannu Congratulates Partner Mathias Boe After India’s Thomas Cup Win esakal

भारतीय पुरूष बॅडमिंटन (Badminton) संघाने 14 वेळा थॉमस कप (Thomas Cup 2022) जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा पराभव करत इतिहास रचला. 70 वर्षानंतर भारताने थॉमस कपवर आपले नाव कोरले. या विजयानंतर संघासह कोच माथियास बो (Mathias Boe) वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. मात्र, अभिनेत्री तापसी पन्नूने कोच बो ला दिलेल्या शुभेच्छांची चर्चा सर्वत्र अधिक रंगली आहे.

तापसीने ट्विट करत कोच बोला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानंतर इंस्टाग्राम स्टोरीवर कोच संघातील खेळाडूंची गळाभेट घेत असलेला फोटो शेअर केला आहे. तापसीची ही पोस्ट चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे कोच माथियास आणि तापसी एकमेकांना डेट करतात.

aapsee Pannu Congratulates Partner Mathias Boe After India’s Thomas Cup Win
IPL सोडण्याची दिग्गजांमध्ये लागली स्पर्धा; केकेआरचा अजिंक्य रहाणे देखील आऊट

तापसी आणि कोच माथियास स्पॉट होत नसले तरी दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. आणि ही गोष्ट दोघे स्विकारतातदेखील. याचा खुलासा तिने एका मुलाखतीदरम्यान केला होता. इंडस्ट्रीच्या बाहेरील व्यक्तीला मी पसंद करते. माझं नशिब चांगल आहे की मला करिअरच्या सुरुवातीला ती व्यक्ती भेटली. ज्याच्यामुळे मला आनंद मिळतो. आमच्या दोघांचे विचार विरोधी आहेत त्यामुळे खुप मजा येते.

भारताने इतिहासात पहिल्यांदाच थॉमस कप फायनलमध्ये प्रवेश केला होता. आपल्या पहिल्याच फायनमध्ये भारतीय पुरूष संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने 14 वेळा थॉमस कप जिंकणाऱ्या इंडोनेशियाचा परावभ केला. भारताने इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. भारत यापूर्वी थॉमस कपमध्ये 1952, 1955 आणि 1979 मध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचला होता. तर महिला बॅडमिंटन संघाने 2014 आणि 2016 ला उबर कपच्या अंतिम चार संघात प्रवेश केला होता.

aapsee Pannu Congratulates Partner Mathias Boe After India’s Thomas Cup Win
"ये बच्चों का खेल नहीं" तीन शतकं ठोकूनही बटलर होतोय ट्रोल

ऑलिम्पिक पदक विजेता आहे माथियास

माथियास बो एक टॅलेंटेड स्पोर्ट मॅन आहे. तो ऑंलंपिक पदक विजेता आहे. डेन्मार्कचा अव्वल दुहेरीचा बॅडमिंटनपटू मॅथियासने लंडन ऑलिम्पिक २०१२ आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप २०१३ मध्ये रौप्य पदक जिंकले.

2020 मध्ये, बोने आपल्या चमकदार कारकिर्दीला अलविदा केला आणि कोचिंगकडे वळले. त्यांची भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघासाठी पुरुष दुहेरी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com