ईशा जोशी, सनत बोकीलला अग्रमानांकन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

पुणे, ता. 21 : रेडिएंट स्पोर्टस अकादमी आणि टेबल टेनिस प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित
दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस उद्यापासून (ता. 22) प्रारंभ होत असून, यांत पुरुष व महिला गटात अनुक्रमे सनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन देण्यात आले आहे.

पुणे, ता. 21 : रेडिएंट स्पोर्टस अकादमी आणि टेबल टेनिस प्रमोशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित
दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेस उद्यापासून (ता. 22) प्रारंभ होत असून, यांत पुरुष व महिला गटात अनुक्रमे सनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन देण्यात आले आहे.
पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने कोथरूड येथील सन्मित्र संघाच्या टेबल टेनिस हॉलमध्ये
27 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण साडेपाचशे स्पर्धकांनी भाग घेतला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 70 हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. यंदाच्या मोसमातील ही तिसरी स्पर्धा आहे. या स्पर्धेत ईशा जोशीला महिला गटाबरोबरच 21 वर्षांखालील मुली, तर शौनक शिंदेला अठरा व एकवीस वर्षांखालील अशा दोन गटांतून अग्रमानांकन देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी मुख्य पंच म्हणून विलास बावकर हे काम पाहणार आहेत.
गटवार मानांकन असे ः
पुरुष गट ः सनत बोकील, वैभव दहिभाते, ऋषभ सावंत, आदर्श गोपाळ, रजत कदम, अद्वैत ब्रह्मे, शौनक शिंदे, शेखर काळे. महिला गट ः ईशा जोशी, सलोनी शहा, उज्ज्वला गायकवाड, श्रुती गभाणे. प्रौढ गट ः अजय, दीपेश अभ्यंकर, अविनाश जोशी, शेखर काळे.
21 वर्षांखालील मुले ः शौनक शिंदे, सनत बोकील, आदर्श गोपाळ, करण कुकरेजा. मुली ः ईशा जोशी, सलोनी शहा, पृथा वर्टीकर, उज्ज्वला गायकवाड.
18 वर्षांखालील मुले ः शौनक शिंदे, करण कुकरेजा, श्रीयश भोसले, आदर्श गोपाळ. मुली ः अंकिता पटवर्धन, पृथा वर्टीकर, अनीहा डीसूझा, श्रुती गभाणे
15 वर्षांखालील ः मुले ः अनय कोव्हेलामुडी, आर्चन आपटे, आदी फ्रॅंक अगरवाल, भार्गव चक्रदेव.
मुली ः पृथा वर्टीकर, अनीहा डीसूझा, मृण्मयी राईखेलकर, मयूरी ठोंबरे.
12 वर्षांखालील मुले ः नील मुळ्ये, वेदांग जोशी, अद्वैत ढवळे, कुमार कुलकर्णी. मुली ः देवयानी कुलकर्णी, आनंदिता लुणावत, साक्षी पवार, जान्हवी फणसे.
10 वर्षांखालील मुले ः स्वरूप भादलकर, रामानूज जाधव, अभिराज सकपाळ, वीर डोंगावकर. मुली ः
नभा किरकोळे, रुचिता दारवटकर, तनया अभ्यंकर, नैशा रेवास्कर.
Web Title: Table tennis competition