

Indian Table Tennis Federation Suspended by Sports Ministry Over Administrative Irregularities and Management Failures
sakal
नवी दिल्ली: प्रशासनात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याचे सांगत क्रीडा मंत्रालयाने भारतीय टेबल टेनिस महासंघाची मान्यता निलंबित केली आहे. तसेच या खेळाचा कारभार पाहण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेला अस्थायी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. वेळेत निवडणुका न घेणे हे टेबल टेनिस महासंघाच्या निलंबनाच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे क्रीडा मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.