Vita Dani : अल्टीमेट टेबल टेनिस लीग; खेळाचे वातावरण बदलत आहे - विटा दाणी

२०१७ मध्ये चालू झालेल्या या स्पर्धेचे हे चौथे सत्र आज होत आहे. कारण मधली दोन वर्षे कोविडच्या त्रासाने गमवावी लागली.
Table Tennis League Shiv Chhatrapati Sports Complex Balewadi scheduled sunday vita dani niraj bajaj
Table Tennis League Shiv Chhatrapati Sports Complex Balewadi scheduled sunday vita dani niraj bajajSakal

पुणे : शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडीला अल्टीमेट टेबल टेनिस लीगचा अंतिम सामना रविवारी संध्याकाळी रंगणार असताना उद्योगपती निरज बजाज यांच्यासह या संकल्पनेला रूप देणाऱ्‍या विटा दाणी यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

निरज बजाज स्वत: उत्तम टेबल टेनिस खेळायचे आणि विटा दाणींचा मुलगा मुदीत उच्चस्तरीय टेबल टेनिसपटू असल्याने दोघांनी मिळून भारतात टेबल टेनिसला वेगळी सकारात्मक दिशा देण्याच्या उद्देशाने अल्टीमेट टेबल टेनिस लीगचा घाट घातला.

२०१७ मध्ये चालू झालेल्या या स्पर्धेचे हे चौथे सत्र आज होत आहे. कारण मधली दोन वर्षे कोविडच्या त्रासाने गमवावी लागली. सहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत भारतातील सगळे दर्जेदार खेळाडू काही मोजक्या परदेशी खेळाडूंसह एकमेकांशी गेले दोन आठवडे झुंजत होते.

‘‘भारतात टेबल टेनिस लोकप्रिय आहेच, आम्हाला त्याला अजून चांगले स्वरूप देण्याची इच्छा होती. भारतातील तरुण होतकरू खेळाडूंना देशी-परदेशी दर्जेदार खेळाडूंशी दोन हात करता यावेत. आपल्या खेळाच्या जरा वरच्या स्तराशी खेळून क्षमता तपासण्याची संधी भारतीय खेळाडूंना मिळावी असा आमचा उद्देश होता,’’ असे विटा दाणी सांगत होत्या.

खेळाडूंबरोबर निष्णात प्रशिक्षक अल्टीमेट टेबल टेनिस लीगच्या निमित्ताने येतात. त्याचाही मोठा फायदा खेळाडूंना होतो, असा मुद्दा मांडल्यावर विटा दाणी म्हणाल्या, ‘‘अर्थातच होतो. आपले कसब सातत्याने अभ्यास करून वाढत ठेवणारे प्रशिक्षक खेळाडूंना नव्या तंत्राची ओळख करून देतात.

प्रशिक्षकांबरोबर व्यायामाचे, आहाराचे तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. मला वाटते शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक तयारी आता गरजेची झाली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्‍या काही संघांसोबत खेळ मानसोपचार तज्ज्ञही मार्गदर्शन करायला हजर आहेत, ज्याचा खूप चांगला परिणाम होणार आहे.’’

अल्टीमेट टेबल टेनिस लीगने चांगली प्रगती केली असूनही विटा दाणी जास्त श्रेय घ्यायला तयार नव्हत्या. ‘‘असे बघा, हा एकत्रित प्रयत्न आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनने आम्हाला भक्कम पाठिंबा दिला आहे. मी तर म्हणेन भारतात खेळाचे वातावरण बदलत आहे. खूप सकारात्मक बदल केले जात आहेत. सरकार कार्यक्षम पद्धतीने खेळाकडे बघत आहे. २०२४ साली पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत टेबल टेनिसच्या खेळात पदक मिळवायचे आमचे उद्दिष्ट आहे.’’ असे विटा दाणी म्हणाल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com