आयपीएल लिलावाची फायनल लिस्ट जाहीर, 405 खेळाडूंचे देव पाण्यात | TATA IPL 2023 Player Auction | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2023 Auction

IPL Auction 2023 : आयपीएल लिलावाची फायनल लिस्ट जाहीर, 405 खेळाडूंचे देव पाण्यात

IPL Auction 2023 : आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने नुकतेच 23 डिसेंबरला होणाऱ्या TATA IPL 2023 Player Auction साठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली. यंदाच्या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. त्यात 273 भारतीय खेळाडूंचा तर 132 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

हेही वाचा: Shoaib Malik : शोएबचा मोठा कारनामा! अशी कामगिरी करणारा ठरला आशियातील पहिला क्रिकेटपटू

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज आयपीएल लिलाव 2023 साठी शॉर्टलिस्ट केलेली केलेली खेळाडूंची यादी जाहीर केली. यात 991 नोंदणी केलेल्या खेळाडूंच्या यादीतून फ्रेंचायजींनी 369 खेळाडूंची यादी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलकडे सादर केली होती. त्यानंतर फ्रेंचायजींना अजून 36 नावांची निवड करण्यास सांगण्यात आले. या अधिकचे 36 खेळाडू आणि आधीचे 369 खेळाडू असे मिळून एकूण 405 खेळाडूंचा लिलाव येत्या 23 डिसेंबरला कोचीमध्ये होणार आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : रोहित नसल्यामुळे राहुल द्रविडचे काम सोपे झाले... कैफने केले मोठे वक्तव्य

या 405 खेळाडूंपैकी 273 खेळाडू हे भारतीय आहेत तर 132 खेळाडू हे विदेशी आहेत. तर 4 खेळाडू हे असोसिएट नेशन्सचे आहेत. यात एकूण 119 कॅप खेळाडू असून 282 हे अनकॅप खेळाडू आहेत. 19 परदेशी खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी रूपये इतकी आहे. तर 11 खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही 1.5 कोटी रूपये ठेवली आहे. तर मनिष पांडे आणि मयांक अगरवाल यांच्यासह 20 खेळाडूंनी आपली बेस प्राईस ही 1 कोटी रूपये ठेवली आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

टॅग्स :CricketauctionIPL