अर्जेंटिना रंगात नाहले चहा विक्रत्याचे घर 

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

पात्रांचे अर्जेंटिना प्रेम 
-1986 च्या अंतिम लढतीपासून मॅराडोनाचे चाहते 
-मॅराडोनाच्या अस्तानंतर मेस्सी ठरला हिरो 
-मेस्सीचा वाढदिवसही साजरा करतात 
-मेस्सीच्या वाढदिवशी चहा, सामोसा फुकट, रक्तदान शिबिर 
-या वेळी अर्जेंटिनाच्या 100 जर्सींची खरेदी 
-मेस्सीबरोबर हनुमान भक्त, मेस्सीच्या डाव्या पायावर शेंदूर लावतात 

कोलकाता - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील लिओनेल मेस्सीचा खेळ पाहण्याचे त्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. त्यासाठी चहा विकून जमा केलेले 60 हजार रुपयेही तोकडे पडले. अखेर त्यांनी आपल्या तीन मजली घरालाच अर्जेंटिना ध्वजाच्या रंगात रंगविले. 

मेस्सीच्या अर्जेंटिनाची विश्‍वकरंडक लढत थेट बघण्याचे शिवशंकर पात्रा यांचे स्वप्न होते. त्यांनी 60 हजार जमाही केले; पण कोलकात्यातील एजंटने लढत पाहण्यासाठी किमान दीड लाख लागतील, असे सांगितल्यावर त्यांनी रशियाला जाण्याची योजनाच सोडून दिली आणि आपल्या घराला थेट अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगात रंगविले. 

मला फक्त मेस्सीचे व्यसन आहे, असे पात्रा अभिमानाने सांगतात. हे त्यांच्या घरात गेल्यावर लक्षात येते. कोलकात्यातील इच्चापोर स्थानकावर उतरल्यावर कोणालाही अर्जेटिना चायेर दोकान कुठे आहे, हे विचारल्यावर सहज मार्ग सापडतो. अर्जेंटिनाचा रंग तर दुरूनही घर कुठे आहे ते सांगतो. 

घरातील सर्व भिंती अर्जेंटिनाच्या रंगात आहेत. त्यातून पूजा स्थळही सुटलेले नाही. प्रत्येक खोलीतील किमान एका भिंतीवर मेस्सीचे छायाचित्र आहे. मेस्सी काय खातो, त्याच्याकडे कोणत्या कार आहेत, हे पात्रा यांच्या मुलांना पाठ आहे. ते त्याची एकही लढत सोडत नाहीत. ते लवकर झोपल्याचे नाटक करतात; पण गुपचूप मोबाईलवर मॅच पाहतात, असे ते हसत हसत सांगतात. 

पात्रांचे अर्जेंटिना प्रेम 
-1986 च्या अंतिम लढतीपासून मॅराडोनाचे चाहते 
-मॅराडोनाच्या अस्तानंतर मेस्सी ठरला हिरो 
-मेस्सीचा वाढदिवसही साजरा करतात 
-मेस्सीच्या वाढदिवशी चहा, सामोसा फुकट, रक्तदान शिबिर 
-या वेळी अर्जेंटिनाच्या 100 जर्सींची खरेदी 
-मेस्सीबरोबर हनुमान भक्त, मेस्सीच्या डाव्या पायावर शेंदूर लावतात 

Web Title: tea seller's home are colored in Argentina color