esakal | INDvsWI : अंतिम सामन्याआधी टीम इंडिया करतीये अशी मजा, बघा फोटो!
sakal

बोलून बातमी शोधा

Team India enjoys ahead of 3rd ODI against West Indies

कोहली संघातील सहकाऱ्यांसोबत वेळ घालवताना आणि मस्ती करताना दिसला. त्याने स्वत: हे फोटे ट्विटरवरुन शेअर केले आहेत. या फोटोंत कोहलीसोबत केदार जाधव, रिषभ पंत, मनिष पांडे, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर फोटोत दिसत आहेत. एका स्विमिंगपूलच्या बाजूला मस्ती करतानाचे हे फोटो आहेत. 

INDvsWI : अंतिम सामन्याआधी टीम इंडिया करतीये अशी मजा, बघा फोटो!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भुवनेश्वर : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील तिसरा आणि अंतिम सामना ओरिसातील कटकच्या मैदानावर होणार आहे. मालिका सध्या 1-1 बरोबरीत असल्याने दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठीच मैदानात उतरतील. या सामन्यापूर्वी मात्र, विराटसेनेने कसून सराव करण्याऐवजी एकमेकांसोबत एन्जॉय करणे पसंत केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोहली संघातील सहकाऱ्यांसोबत वेळ घालवताना आणि मस्ती करताना दिसला. त्याने स्वत: हे फोटे ट्विटरवरुन शेअर केले आहेत. या फोटोंत कोहलीसोबत केदार जाधव, रिषभ पंत, मनिष पांडे, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर फोटोत दिसत आहेत. एका स्विमिंगपूलच्या बाजूला मस्ती करतानाचे हे फोटो आहेत. 

वर्षाचा अखेरचा सामना
भारतीय क्रिकेट संघाचा हा वर्षीचा अखेरचा सामना आहे. हा सामना जिंकून टीम इंडिया वर्षाचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल. पुढील वर्षी जानेवारीत भारताला श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.

loading image