Team India : रोहितच्या कर्णधारपदाखाली 'या' खेळाडूचे करिअर संपली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 team india

Team India : रोहितच्या कर्णधारपदाखाली 'या' खेळाडूचे करिअर संपली!

Indian Cricket Team : मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून तो बाहेर पडला आहे. शमीची जागा अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादवने घेतली आहे. सध्या भारतीय संघात प्रत्येक जागेसाठी तीन ते चार खेळाडू दावेदार आहेत. त्यामुळे एखाद्या खराब मालिकेमुळे खेळाडूच्या कारकिर्दीवर परिणाम करू शकते. टीम इंडियाचा एक खेळाडू असाही आहे ज्याला अनेक महिन्यांपासून संघात स्थान मिळालेले नाही. टीम इंडियामध्ये या खेळाडूचे महत्त्व अचानक कमी झाले आहे.

हेही वाचा: Video : योगींच्या राज्यात लाईव्ह मॅचमध्येच बत्ती गुल; चाहत्यांनी केला दंगा...

टीम इंडियाकडे सध्या कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारखे वेगवान गोलंदाज आहेत. हे खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे वेगवान गोलंदाज इशांत शर्मा संघातून गायब झाला आहे. आता इशांत शर्माचे संघात पुनरागमन करणे कठीण दिसत आहे. इशांत शर्माने नोव्हेंबर २०२१ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.

हेही वाचा: Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया नव्या अवतारात, पाहा 2007 पासूनच्या जर्सी

इशांत शर्माने 2007 मध्ये टीम इंडियासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. यानंतर पुढच्याच महिन्यात इशांतला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने टीम इंडियासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. खराब फॉर्म आणि फिटनेसमुळे इशांत शर्माला टीम इंडियातून वगळण्यात आले होते.

इशांत शर्मा टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. इशांत शर्माने भारतासाठी 105 कसोटी सामने खेळले असून 311 विकेट्स घेतले आहेत. इशांतने आतापर्यंत 80 एकदिवसीय सामन्यात 115 विकेट घेतले आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये इशांत शर्माला तितकेसे यश मिळाले नाही. त्याने 14 टी-20 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. इशांत शर्माने 2016 नंतर टीम इंडियासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही. आयपीएलमध्येही त्याला संधी मिळत नाहीये. यावरून आता या खेळाडूकडे निवृत्तीचाच पर्याय उरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Team India Fast Bowler Ishant Sharma Career Over T20 Match Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..