
भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासह पंत, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गील आणि सैनी यांनी जैव सुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर येत आहे. या पाच जणांना टीमपासून विलगिकरण केल्याचे वृत्त आहे.
Australia vs India : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सिडनीतील कसोटी सामना होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला असताना टीम इंडियातील पाच जणांनी कोरोना प्रोटोकॉलच उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. 7 जानेवारीपासून सिडनीच्या मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना नियोजित आहे. या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मासह पंत, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गील आणि सैनी यांनी जैव सुरक्षा नियमाचे उल्लंघन केल्याचे समोर येत आहे. या पाच जणांना टीमपासून विलगिकरण केल्याचे वृत्त आहे.
जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण
रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गील आणि नवदीप सैनी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ही मंडळी एका हॉटेलमध्ये जेवण करताना दिसत आहेत. हे पाच खेळाडू ज्या ठिकाणी बसले आहेत. त्याठिकाणी बसण्याची परवानगी नाही. मेलबर्नमधील एका रेस्टोरंटच्या सिक्रेट किचनमध्ये पाच जण बसल्याचे व्हिडिओतून दिसून येते. बाहेर बसण्यास परवानगी असताना ही मंडळी निर्बंध असलेल्या ठिकाणी बसल्याचे आढळून आले आहे.
अन् ऑस्ट्रेलियन दिग्गजानं पाहिलं स्मिथ-कोहली पार्टनरशिपच स्वप्न
मॉर्निग हेराल्ड आणि द एज या ऑस्ट्रेलियात प्रसारमाध्यमांनी रेस्टोरेंटच्या स्टाफ सदस्यांचा दाखला देत व्हिडिओची पृष्टी केली आहे. या खेळाडूंनी रेस्टोरंटला भेट दिली. ते आत बसल्याचे स्टाफ सदस्याने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे. नवदीप सिंह नावाच्या भारतीय चाहत्याने खेळाडूंसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे ही गोष्ट समोर आली. या चाहत्यानेच खेळाडूंचे118.69 डॉलरचे बील भागवले. त्याने खेळाडू शॉपिंग करत असल्याचे काही फोटोही शेअर केले आहेत.