IND Squad For IRE: लग्नाच्या 1 महिन्यातच बदललं नशीब! एक वर्षानंतर 'या' दिग्गज खेळाडूंची टीम इंडियात एन्ट्री अन्...

IND Squad For IRE
IND Squad For IRE

IND Squad For IRE Prasidh Krishna : एक दिवस आधी बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. यामध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसह आणखी एक वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन केले आहे. प्रसिद्ध दुखापतीमुळे गेल्या 1 वर्षापासून टीम इंडियाच्या बाहेर होता.

1 वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या टी-20 स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना 4 षटकात 36 धावा देत 4 बळी घेतले. माउंट जॉय क्रिकेट क्लबकडून खेळताना सर सय्यद क्रिकेटर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने अशी गोलंदाजी केली.

IND Squad For IRE
WI vs IND 3rd ODI: रोहित-विराटच्या पुनरागमनामुळे भारतीय इलेव्हनचे बदले समीकरण, सूर्या अन् संजू बाहेर?

प्रसिद्ध कृष्णाचे एक महिन्यापूर्वीच लग्न झाले आणि तेव्हापासून त्याचे नशीब बदललं आहे. तब्बल 1 वर्षानंतर तो संघात परतला. त्याला पहिल्यांदाच टी-20 संघात संधी मिळाली. 27 वर्षीय प्रसिद्धने भारतासाठी आतापर्यंत 14 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

ऑगस्ट 2022 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर तो शेवटचा एकदिवसीय सामने दिसला होता. या दौऱ्यानंतर, न्यूझीलंड-अ विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी त्याची भारत-अ संघात निवड झाली. पण स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे तो या मालिकेचा भाग होऊ शकला नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर खेळला.

IND Squad For IRE
WI squad T20 vs IND : टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा! 'या' दिग्गज खेळाडूंची संघात एन्ट्री

प्रसिद्ध कृष्णाला या वर्षाच्या सुरुवातीला स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे कर्नाटकसाठी रणजी करंडक स्पर्धेतील बाद फेरीचे सामनेही मुकावे लागले होते. तो गेल्या काही काळापासून एनसीएमध्ये जसप्रीत बुमराहसोबत पुनर्वसन पूर्ण करत होता. यादरम्यान त्याने सराव सामने आणि नेटमध्ये चांगली गोलंदाजी केली. हे लक्षात घेऊन त्याची आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.

आयर्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियाला पाकिस्तान-श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळायचे आहे. अशा परिस्थितीत या स्पर्धेसाठी भारतीय संघातही प्रसिद्ध खेळाडूंची निवड होऊ शकते. आयर्लंड दौऱ्यावर खेळताना त्याला मॅच सरावही मिळेल.

आयर्लंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com