WI squad T20 vs IND : टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा! 'या' दिग्गज खेळाडूंची संघात एन्ट्री

West Indies squad T20 vs India
West Indies squad T20 vs India

West Indies squad T20 vs India : वेस्ट इंडिजने एकदिवसीय सामन्यांनंतर भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या घरच्या टी-20 मालिकेसाठी 15 खेळाडूची घोषणा केली आहे. रोव्हमन पॉवेल संघाचा कर्णधार असेल. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेत कॅरेबियन संघाचे कर्णधार असलेल्या शाई होपची टी-20 संघातही निवड झाली आहे.

होप व्यतिरिक्त ओशेन थॉमसलाही संधी मिळाली आहे. होप एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचा कर्णधार आहे पण गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून तो वेस्ट इंडिजसाठी एकही टी-20 खेळलेला नाही. त्याच वेळी थॉमस शेवटचा 2021 मध्ये वेस्ट इंडिजसाठी टी-20 मध्ये दिसला होता.

West Indies squad T20 vs India
Team India Squad : सूर्यकुमार यादवची हकालपट्टी! टीम इंडियाला मिळाला नवा उपकर्णधार

भारताविरुद्धच्या पहिल्या 2 वनडेत शाई होपने चांगली फलंदाजी केली. त्याने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 43 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 63 धावांची खेळी खेळून वेस्ट इंडिजवर विजय मिळवला. होपने फेब्रुवारी 2022 मध्ये भारताविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर शेवटचा टी-20 सामना खेळला होता.

West Indies squad T20 vs India
India squad for Ireland T20: 'तो' आला अन् थेट कर्णधार झाला! आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

रोव्हमन पॉवेल टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचे कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर यांच्याशिवाय उपकर्णधार काईल मायर्स हे फलंदाजीत संघाचे हुकमी एक्के असतील. पूरनने अलीकडेच मेजर लीगच्या अंतिम सामन्यात 55 चेंडूत नाबाद 137 धावांची खेळी करून एमआय न्यूयॉर्कला विजेतेपद मिळवून दिले.

या वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज पात्र ठरू शकला नाही. भारताविरुद्धची टी-20 मालिका त्यांना पुढील वर्षीच्या टी-20 विश्वचषकाची तयारी करण्यास मदत करेल, ज्याचे ते युनायटेड स्टेट्ससह सह-यजमान असतील.

West Indies squad T20 vs India
ENG vs AUS Ashes 5th Test: रोमहर्षक कसोटी सामन्यात इंग्लंडचा नाट्यमय विजय! ब्रॉडने शेवट केला गोड

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी त्रिनिदाद ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 गयानामध्ये होईल. शेवटचे दोन सामने फ्लोरिडामध्ये होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com