Gautam Gambhir Net Worth: 5 किलो चांदी, BMW अन् बरच काही...टीम इंडियाचा नवा कोच आहे कोट्याधिश

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा माजी खासदार गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
 team india new coach gautam gambhir Net Worth and car collection
team india new coach gautam gambhir Net Worth and car collection
Updated on

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा माजी खासदार गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच T20 क्रिकेट वर्ल्डकप जिंकल्यानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून राजीनामा दिला होता. मंगळवारी (9 जुलै) बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याचं जाहीर केलं आहे.

गंभीरला आता मोठी जबाबदारी मिळाली आहे. पण याआधी त्याने आयपीएलमध्ये कॉमेंट्री आणि मेंटॉरशिप करून खूप कमाई केली आहे. याशिवाय त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. चला तर मग जाणून घेऊया भारतीय संघाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची एकूण संपत्ती.

 team india new coach gautam gambhir Net Worth and car collection
Gautam Gambhir Coach: गौतम गंभीरचा कार्यकाळ किती असणार अन् सूत्र केव्हा हाती घेणार? जाणून घ्या अपडेट्स

तर गंभीरकडे एकूण संपत्ती 265 कोटी रुपये आहे. तो केवळ क्रिकेटमधूनच नव्हे तर ब्रँड प्रायोजकत्व आणि अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून भरपूर कमाई करतो. छोटे व्यवसाय, रेस्टॉरंट आणि रिअल इस्टेटमध्येही त्यांची गुंतवणूक आहे.

स्टार स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री आणि इतर क्रिकेट मीडियासोबत झालेल्या डीलमधून गंभीरने 1.5 कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत गंभीर पूर्व दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्याने निवडणूक आयोगासमोर आपले वार्षिक उत्पन्न १२.४ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.

 team india new coach gautam gambhir Net Worth and car collection
Gautam Gambhir Coach: शिक्कामोर्तब झाले! गौतम गंभीर बनला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, BCCI ची घोषणा

दिल्लीतील राजिंदर नगरमध्ये 15 कोटींचे अलिशान घर

गौतम गंभीरचे दिल्लीतील राजिंदर नगर परिसरात अलिशान घर आहे. ज्याची किंमत अंदाजे 15 कोटी रुपये आहे. याशिवाय त्याच्याकडे ग्रेटर नोएडा येथील जेपी विश टाऊनमध्ये 4 कोटी रुपयांचा प्लॉट आहे. त्यांचा मलकापूर गावात एक कोटी रुपयांचा प्लॉटही आहे. याशिवाय त्याच्याकडे ५ किलो चांदी आहे.

आयपीएलमधून 25 कोटींची कमाई

गौतम गंभीरने शेवटचा सामना 2018 मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता, जेव्हा त्याला एक हंगाम खेळण्यासाठी 2.8 कोटी रुपये मिळाले होते. पण आयपीएल 2024 मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्समध्ये मार्गदर्शक म्हणून सामील झाला. गंभीरने आयपीएल 2025 मध्ये मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी 25 कोटी रुपये घेतले होते. गंभीरने एकही सामना न खेळता आयपीएलमध्ये खेळाडूंपेक्षा जास्त कमाई केली आहे.

 team india new coach gautam gambhir Net Worth and car collection
Gautam Gambhir Statement: "मी पुन्हा आलो पण, सर्व शक्तीनिशी..."; हेड कोच होताच गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य!

गौतम गंभीरचे कार कलेक्शन

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरलाही कारची आवड आहे. त्याच्याकडे ऑडी Q5 आणि BMW 530d आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा कोरोला आणि महिंद्रा बोलेरो स्टिंगर देखील आहेत. यासोबतच मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे मर्सिडीज GLS 350D देखील आहे, ज्याची बाजारातील किंमत सुमारे 88 लाख रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.