Ind vs Aus : रोहितला पडला प्रश्न, काय असू शकते टीम इंडियाची Playing-11? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

team india playing 11 t20i australia

Ind vs Aus : रोहितला पडला प्रश्न, काय असू शकते टीम इंडियाची Playing-11?

Team India Playing 11 t20i Ind vs Aus : आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडियाला ज्या समस्येचा सामना करावा लागला, तीच समस्या पुन्हा एकदा संघ व्यवस्थापनासमोर असणार आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मंगळवार 20 सप्टेंबर पासून मोहाली येथे पहिल्या टी-20 खेळला जाणार आहे. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला संधी द्यायची. संघाची प्लेईंग इलेव्हन कोणती असेल, हा सर्वात मोठा प्रश्न रोहितसमोर असणार आहे.

हेही वाचा: Ind W vs Eng W: मंधानाचे शतक हुकले; भारताने पहिल्या ODI सामन्यात इंग्लंडचा केला पराभव

टीम इंडियाच्या पहिल्या चार स्थानांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. रोहित शर्मासह केएल राहुल ओपनिंग करणार आहे. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर असेल. हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर असू शकतो, पण यानंतर कोण असेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत हे सहाव्या क्रमांकाचे दोन मोठे दावेदार आहेत, ज्यामध्ये पंतला प्राधान्य दिले जाऊ शकते.

हेही वाचा: Ind vs Aus : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिनेश कार्तिकऐवजी रिषभ पंतला खेळवा - गौतम गंभीर

टीम इंडियाकडे पहिल्या पाच ठिकाणी उजव्या हाताचे फलंदाज आहेत. सध्याच्या लाईनअपमध्ये फक्त ऋषभ पंत डाव्या हाताचा पर्याय आहे. यामुळेच दिनेश कार्तिक बाहेर बसू शकतो. त्याला संधी मिळू शकते, पण या स्थितीत संघाला हार्दिक पांड्याशिवाय फक्त चार गोलंदाज निवडता येतील आणि या स्थितीत दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल संघाबाहेर असतील. युझवेंद्र चहल आणि आर अश्विन हे फिरकीपटू खेळणार आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारसोबत हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराहची जोडी खेळताना दिसल. टी-20 विश्वचषकापूर्वी संघ व्यवस्थापनासाठी संघ रचना ही सर्वात मोठी समस्या आहे.

हेही वाचा: Indian Team New Jersey : T20 वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची नवीन जर्सी लाँच, पहा Photo

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (team india playing 11 t20i australia)-

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत(विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह

Web Title: Team India Probable Playing 11 T20i Match Against Australia Mohali Rohit Sharma Cricket Ind Vs Aus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..