Team India Semi Final Scenario : बांगलादेशला हरवून भारतीय संघ पोहोचणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या समीकरण

Team India Semi Final Scenario in World Cup 2023
Team India Semi Final Scenario in World Cup 2023

Team India Semi Final Scenario in World Cup 2023 : भारतात खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 अतिशय रोमांचक सामने पाहिला मिळत आहे. श्रीलंका वगळता सर्व 9 संघांनी आपले विजयाचे खाते उघडले आहे.

पण या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आणि न्यूझीलंडचा आत्तापर्यंतचा प्रवास एकदम भारी राहिला आहे. किवी संघाने पहिले चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघाने पहिले तीन सामने जिंकले असून ते दुसऱ्या स्थानावर आहे.

Team India Semi Final Scenario in World Cup 2023
Ind vs Ban : Instagram सेलिब्रिटीला मिळणार पुण्यातील मॅचचं 'फ्री' तिकीट, अट फक्त एकच... रोहित पवारांचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाला आता चौथा सामना आज (१९ ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध पुण्याच्या मैदानावर खेळायचा आहे. जर भारतीय संघ हा सामना जिंकला तर तो न्यूझीलंडला मागे टाकून पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान होईल आणि किवी संघासोबत उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अगदी जवळ येईल.

बांगलादेशला पराभूत केल्यानंतर, भारतीय संघाने पुढील 2 सामने जिंकले, तर 6 विजय अन् 12 गुणांसह उपांत्य फेरीसाठी मजबूत दावेदारी ठोकेल. मात्र उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला पुढील आणखी 3 सामने जिंकावे लागणार आहेत. मग रोहित आणि ब्रिगेडला उपांत्य फेरीत जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

बांगलादेशचा पराभव करून पुढील 3 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघाचे 7 सामन्यात एकूण 14 गुण होतील. सध्या भारतीय संघ 3 सामने जिंकून 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी त्याला उर्वरित 6 पैकी किमान 3 ते 4 सामने जिंकावे लागतील.

भारतीय संघाला पुण्यात बांगलादेशविरुद्ध चौथा सामना खेळायचा आहे. त्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाला धर्मशाला येथे न्यूझीलंड, लखनऊमध्ये इंग्लंड, मुंबईत श्रीलंका, कोलकाता येथे दक्षिण आफ्रिका आणि बेंगळुरूमध्ये नेदरलँड्सविरुद्ध उर्वरित सामने खेळायचे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com