Wi vs Ind Test : वर्ल्डकप 2023 नंतर राहुल द्रविड सोडणार प्रशिक्षकपद? 'या' कारणाने घेणार मोठा निर्णय...

वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडियामध्ये होणार मोठे बदल
Rahul Dravid  World Cup 2023
Rahul Dravid World Cup 2023 esakal
Updated on

Rahul Dravid World Cup 2023 : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे. या स्पर्धेनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. जर भारताने विश्वचषक जिंकला तर त्यानंतर टीम इंडियाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविडला वैयक्तिक कारणांमुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडत आहे.

Rahul Dravid  World Cup 2023
Khalapur Irshalwadi Landslide: माळीण घटनेनंतर आढावा घेतला होता पण...इर्शाळवाडी घटनेनंतर अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

टी-20 विश्वचषक 2021 मधील पराभवानंतर रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर राहुल द्रविडला टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवण्यात आले. राहुल द्रविड त्यावेळीही टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्यास तयार नव्हता. पण बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यासाठी राहुल द्रविडला पटवले.

Rahul Dravid  World Cup 2023
Asia Cup 2023 Schedule: वर्ल्ड कपआधी 16 दिवसांत 3 वेळा भारत-पाकिस्तानमध्ये लढत? कशी अन् कधी, जाणून घ्या

बीसीसीआयशी संबंधित एका सूत्राने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितले की, 'राहुल द्रविड प्रशिक्षकपदासाठी तयार नव्हता. परदेश दौऱ्यांमुळे फार काळ कुटुंबापासून दूर राहायचे नव्हते. त्याने टीम इंडियासाठी ही जबाबदारी घेतली असली तरी, भारताने वर्ल्ड कप जिंकला तर त्याला या पदावर राहायचे नाही.

Rahul Dravid  World Cup 2023
Ind vs Pak Asia Cup: राजवर्धननंतर सुदर्शनने उडवली झोप, भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानला पाजले पराभवाचे पाणी

मात्र, याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. सध्या टीम इंडियाची नजर घरच्या मैदानावर होणाऱ्या वनडे वर्ल्डकपवर आहे. भारताने 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली शेवटचा विश्वचषक जिंकला होता. अशा परिस्थितीत हे विजेतेपद जिंकून टीम इंडियाला 12 वर्षांचा दुष्काळ संपवायचा आहे.

विश्वचषकापूर्वी राहुल द्रविडलाही विश्रांती देण्यात येणार आहे. टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्यावर राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com