Team India : ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान संग्रहालयात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

Team India : ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान संग्रहालयात! ; फोटो व्हायरल

दिल्लीत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघ पंतप्रधान संग्रहालयात पोहोचला. यावेळी संघासोबत कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड देखील उपस्थित होते. बीसीसीआयनेही त्याचे फोटो शेअर केले आहेत. 

नागपूरपाठोपाठ भारताने दिल्ली कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. नागपूरप्रमाणेच टीम इंडियाने दिल्ली कसोटीही अवघ्या 3 दिवसांत जिंकली. यासह भारताने 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्गही जवळपास मोकळा झाला आहे.

आयसीसी क्रमवारीत दिल्ली कसोटी जिंकल्याचा फायदाही टीम इंडियाला मिळाला आहे. ऑस्ट्रेलियाला खाली ढकलून भारत आता सर्वोत्तम कसोटी संघ बनला आहे. कसोटी क्रमवारीत भारत आता नंबर-1 बनला आहे. दिल्ली कसोटी जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात 121 गुण आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 120 गुण आहेत. वनडे आणि टी-20 मध्ये टीम इंडिया आधीच नंबर 1 टीम आहे. वनडेतही ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर टी-20 मध्ये भारतानंतर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे.