VIDEO : मालिका जिवंत ठेवणाऱ्या टीम इंडियाचे गरबा खेळून स्वागत

चौथ्या टी२०साठी राजकोटला पोहोचले भारतीय खेळाडू.
Team India
Team Indiaesakal

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना खेळण्यासाठी राजकोटमध्ये दाखल झाला आहे. भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्या, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यासह इतर सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ राजकोटमध्ये पोहोचला आहे. दरम्यान, क्रिकेट जगतात राजकोटच्या दौऱ्याची विशेष चर्चा रंगली आहे. त्याचे कारणही तसेच आहे. संघ हॉटेलमध्ये पोहचताच गुजरातचे पारंपारिक नृत्य गरबा खेळत टीम इंडियाचे स्वागत केले.

Team India
भारतासाठी मोठी बातमी! पंच नितीन मेनन ICC एलिट पॅनलमध्ये कायम

बीसीसीआयने टीम इंडिया राजकोटमध्ये पोहचल्यानंतरचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू विशाखापट्टणम ते विमानात बसण्यापासून राजकोटला पोहोचणे हा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला आहे.

यसोबतच राजकोटला पोहोचल्यानंतर, खेळाडू बसने टीम हॉटेलकडे रवाना होतात जिथे त्यांचे स्वागत गरबा नृत्याने केले जाते. अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीपही हा डान्स पाहून चकित झाला. तर अर्शदीप नाचताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा चौथा टी-२० सामना १७ जून रोजी राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. विक्रम राठोड, पारस म्हाम्ब्रे आणि टी दिलीप हा वरिष्ठ सपोर्ट स्टाफ खेळाडूंसोबत १६ जून रोजी रवाना होणार आहे. तर दुसरीकडे एनसीएचे प्रशिक्षक साईराज बहुतुले, मुनीष बाली आणि सितांशु कोटक राजकोट आणि बेंगलोरमध्ये होणाऱ्या पुढच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाला मार्गदर्शन करतील.

Team India
केएल राहुल रवाना होणार, इंग्लंडला नाही तर जर्मनीला!

भारताला हा टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. हिल्या दोन सामन्यात अपेक्षित प्रदर्शन न करू शकलेले भारतीय गोलंदाज तिसऱ्या सामन्यात मात्र चमकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com