

Gautam Gambhir
ESakal
भारताने तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करून टीम इंडियाने इतिहास रचला. भारत T20 विश्वचषक ट्रॉफीचे रक्षण करणारा पहिला देश ठरला. T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या. T20 World Cup फायनलच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या होती. भारताकडून संजू सॅमसनने सर्वात मोठी खेळी केली. ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावा केल्या. याबरोबरच गौतम गंभीरने मोठा विक्रम रचला आहे.