suryakumar yadav
sakal
नवी दिल्ली - सलामीच्या सामन्यात विजयासाठी संघर्ष करावा लागलेल्या भारतीय संघाने टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील आपल्या पुढच्या मोहिमेची तयारी सुरू केली आणि आजच्या सरावात प्रामुख्याने त्यात जमिनीवरील फटक्यांवर भर दिला. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात सर्व प्रमुख फलंदाज हवेत फटके मारून बाद झाले होते.