Novak Djokovic: नोवाक जोकोविच पुन्हा अव्वल

मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे कार्लोस अल्काराझ याची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
Novak Djokovic returns to top spot
Novak Djokovic returns to top spot sakal

पॅरिस : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच पुन्हा एकदा एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे कार्लोस अल्काराझ याची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

Novak Djokovic returns to top spot
IPL 2023 : "गोलंदाजांना ही दुसरी वार्निंग त्यानंतर मी…" विजयानंतर MS धोनी खेळाडूंवर भडकला

जोकोविचने काही दिवसांपूर्वीच महान टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिचा सर्वाधिक ३७७ आठवडे नंबर वन स्थानावर राहण्याचा विक्रम मोडीत काढला होता. त्यानंतर कोरोना लसीकरण पूर्ण केले नसल्यामुळे त्याला मागील आठवड्यात अमेरिकेतील स्पर्धेमध्ये सहभागी होता आले नाही. (Latest Marathi News)

दरम्यान, अल्काराझ याने इंडियन वेल्स स्पर्धा जिंकत एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर झेप घेतली होती, पण मियामी स्पर्धेमध्ये झालेल्या पराभवामुळे अल्काराझ याची घसरण झाली जोकोविच आता तो ३८० वा आठवडा नंबर वन स्थानावर आहे हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com