गुहेत अडकलेल्या फुटबॉलपट्टूंसाठी बचावकार्य अद्यापही सुरु

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

'फिफा'च्या अध्यक्षांनी थायलंडच्या अध्यक्षांना याबाबतचे पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी सांगितले, की या सर्व फु़टबॉलपट्टूंची लवकरच सुटका करण्यात यावी. तसेच त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना विश्वकरंडक सामन्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.  

मॉस्को : गेल्या अनेक दिवसांपासून गुहेत अडकलेल्या फुटबॉलपट्टूंची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यामध्ये अडकलेल्या फुटबॉलपट्टूंची सुटका करण्यात यावी, यासाठी 'फिफा'च्या अध्यक्षांनी थायलंडच्या अध्यक्षांना याबाबतचे पत्र लिहिले. यामध्ये त्यांनी सांगितले, की या सर्व फु़टबॉलपट्टूंची लवकरच सुटका करण्यात यावी. तसेच त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना विश्वकरंडक सामन्याचे निमंत्रणही देण्यात आले आहे.  

या पत्रात थायलंडच्या अध्यक्षांना विनंती केली, की या गुहेत अडकलेल्यांची सुटका सुरक्षितपणे केली जावी. तसेच फिफाचे अध्यक्ष गियॅानी इन्फँटीनो यांनी गुहेतून सुखरूपपणे बाहेर आल्यानंतर या फुटबॉलपटूंना फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीचे विशेष आमंत्रण दिले आहे. तसेच त्यांची विश्वचषक सामन्यापूर्वी त्यांची सुटका करावी, अशीही विनंती त्यांनी यावेळी केली. विश्वकरंडकाची अंतिम लढत 15 जुलैला मॉस्को येथे होणार आहे. 

दरम्यान, तब्बल 10 किमी लांब गुहेत 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे फुटबॉलपटू अडकले. त्यांच्या सुटकेसाठी तब्बल 1200 जवान त्यांना प्रयत्न करत आहेत. या खेळाडूंना बाहेर काढण्याच्या मोहिमेने आंतरराष्ट्रीय स्वरुप घेतले असून, या बचावकार्यासाठी अमेरिकेच्या तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. 

Web Title: Thailand cave rescue More than 100 chimneys drilled into mountain to reach the trapped boys