

Thane Rural Kabaddi, Palghar Kabaddi
Sakal
ठाणे ग्रामीण व पालघर या संघानी अनुक्रमे ५२व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कुमार व कुमारी गटाचे विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएसशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली पिंपरी चिंचवड बोपखेल येथील दिवंगत श्रीरंग धोदाडे क्रीडानगरीत विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे व राकेशभाऊ घुले कबड्डी संघ व युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने ही आमदार चषक कबड्डी स्पर्धा पार पडली.