आर अश्विन हा राजस्थान रॉयल्ससाठी डोकेदुखी, मांजरेकर असं का म्हणाले?

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये आर अश्विनने आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. पण...
आर अश्विन हा राजस्थान रॉयल्ससाठी डोकेदुखी, मांजरेकर असं का म्हणाले?
esakal

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये आर अश्विनने आपल्या कामगिरीनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याच्या वेगाने त्याने क्रिकेट पंडीत आणि चाहत्यांचे मनं जिंकलं आहे. मात्र, माजी दिग्गज क्रिकेटर संजय मांजरेकरने त्याच्या खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अश्विन हा राजस्थानसाठी डोकेदुखी असल्याचे म्हटले आहे.

आर अश्विन हा राजस्थान रॉयल्ससाठी डोकेदुखी, मांजरेकर असं का म्हणाले?
या क्रिकेटरची पत्नी म्हणतीय, जोस बटलर माझा दुसरा पती; नेमकी काय आहे भानगड?

राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. हा सामना अहमदाबाद येथे खेळवण्यात येणार आहे. गुजरातविरुद्ध खेळताना राजस्थानला पराभव स्विकारावा लागला होता. गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात चार षटकात ४० धावा दिल्या.

दरम्यान, मांजरेकर यांनी अश्विनसंदर्भात केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ईएसपीएन क्रिकइंफोशी संवाद साधताना मांजरेकर यांनी अश्विनसंदर्भात भाष्य केलं आहे. अश्विन राजस्थानसाठी डोकेदुखी आहे. कारण सपाट खेळपट्ट्यांवर तो खूप विविधतांचा प्रयत्न करतो. अशा प्रसंगी तो क्वचितच ऑफस्पिनर्सना गोलंदाजी करतो. पण जेव्हा वळण येते तेव्हा तो धोकादायक गोलंदाज बनतो. असे मांजरेकर यांनी म्हटलं आहे.

अहमदाबादला सपाट खेळपट्टी मिळाल्यास आर अश्विन राजस्थानसाठी अडचणीचा ठरेल, असे मांजरेकर यांचे मत आहे.

आर अश्विन हा राजस्थान रॉयल्ससाठी डोकेदुखी, मांजरेकर असं का म्हणाले?
हॉटेल बुक होतं तारीख ठरली होती अन् RCB ने सांगावा धाडला

अश्विनने यंदाच्या सीझनमध्ये गोलंदाजीसह फलंदाजीमध्येही चांगले योगदान दिलं आहे. त्याने १५ सामन्यात ११ विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाजीमध्ये १४७ च्या स्ट्राईक रेटने १८५ धावा केल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com