WPL 2023 Auction : भारतीय महिला क्रिकेटसाठी आज सोन्याचा दिवस! 'या' चॅनलवर पाहता येणार WPL 2023 चा लाईव्ह लिलाव

WPL 2023 Auction
WPL 2023 Auctionesakal

WPL 2023 Auction : भारतीय महिला संघाने टी 20 वर्ल्डकप 2023 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला 7 विकेट्सने मात दिली. वर्ल्डकपची विजयी सुरूवात करणाऱ्या भारतीय महिला संघासाठी आता 13 फेब्रुवारी हा सोन्याची दिवस आहे. कारण आज पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लीग 2023 चा (Women's Premier League) लिलाव होणार आहे. हा लिलाव मुंबईच्या जिओ वर्ल्ड कनव्हेंशन सेंटर येथे होणार आहे. या लिलावात महिला प्रीमियर लीगमधील 5 फ्रेंचायजींना एका संघाचे स्वरूप येणार आहे.

महिला प्रीमियर लीगच्या (WPL 2023) पहिल्या हंगामात खेळण्याची संधी मिळावी यासाठी जगभरताली जवळपास 409 महिला क्रिकेटपटूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. आता पाच फेंचायजी यातून आपली संघ बांधणी करतील. प्रत्येक संघाला लिलावात 12 कोटी रूपये खर्च करण्याची मुभा असेल.

WPL 2023 Auction
Jemimah Rodrigues : ही इनिंग आहे खूप खास... जेमिमाहने पाकिस्तान विरूद्धची दमदार खेळी कोणाला केली समर्पित?

लिलाव कधी अन् कोठे होणार?

महिला प्रीमियर लीग 2023 चा मेगा लिलाव हा आज (दि. 13 फेब्रुवारी) रोजी होणार आहे. लिलाव प्रक्रिया दुपारी 2.30 ला सुहू होईल याचे लाईव्ह प्रक्षेपणे हे जीओ सिनेमावर दुपारी 2 वाजल्यापासूनच सुरू होणार आहे.

WPL 2023 Auction साठी काय आहेत नियम?

बेस प्राईस : महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या लिलावात सर्वात मोठी बेस प्राईस ही 50 लाख इतकी आहे. या श्रेणीत भारताच्या हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि अजून 8 भारतीय खेळाडू आहेत. तर एकूण 24 खेळाडू या श्रेणीत मोडतात. यानंतर 40 लाख बेस प्राईसच्या श्रेणीत 30 खेळाडू आहेत. यात 8 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

किती खेळाडूंचा स्लॉट आहे?

खेळाडूंचा स्लॉट : यंदाच्या महिला प्रीमियल लीगसाठी एकूण 90 खेळाडूंचा स्लॉट आहे. यात एक संघ किमान 15 तर कमाल 18 खेळाडू घेऊ शकतात.

विदेशी खेळाडूंची संख्या : प्रत्येक संघात जास्तीजास्त 6 विदेशी खेळाडू निवडण्याची मुभा राहील. पहिल्या हंगामासाठी एकूण विदेशी खेळाडूंची संख्या ही जास्ताजास्त 30 असेल तर भारतीय खेळाडूंची संख्या 60 असेल.

कोणत्या देशाचे किती खेळाडू?

ऑस्ट्रेलिया - 28, इंग्लंड 27, वेस्ट इंडीज 23, न्यूझीलंड 19, दक्षिण आफ्रिका 17, श्रीलंका 15, झिम्बाब्वे 11, बांगलादेश 9, आयर्लंड 6, युएई 4, अमेरिका, हाँग-काँग, नेदलँड्स आणि थायलंड प्रत्येकी 1, असोसिएट नेशन 8 खेळाडू.

महिला प्रीमियर लीगची लिलाव कोठे दिसणार लाईव्ह?

महिला प्रीमियर लीग 2023 च्या पुढच्या 5 हंगामाच्या प्रक्षेपणाचे हक्क हे व्हायकॉम 18 ने जिंकले आहेत. त्यामुळे लिलावाचे थेट प्रक्षेपण देखील व्हायकॉम 18 वरून पाहता येणार आहे. याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमिंग हे जिओ सिनेमा अॅपवर पाहता येईल.

WPL 2023 Auction
IND vs PAK: अंपायर झोपेत! एका षटकात 6 ऐवजी टाकले 7 चेंडू अन् पाकिस्तानच्या डोळ्यात आले पाणी

महिला प्रीमियर लीगमधील संघ

मुंबई इंडियान्स - शहर - मुंबई, मालक - रिलायन्स इंडस्ट्रीज

रॉयल चॅलेंजर बेंगलोर - शहर - बंगळुरू, मालक - Diageo

दिल्ली कॅपिटल्स - शहर - दिल्ली, मालक - जेएसडब्लू ग्रुप, जीएमआर ग्रुप

गुजरात जायंट्स - शहर - अहमदाबाद, मालक - अदानी ग्रुप

यूपी वॉरियर्स - शहर - लखनौ, मालक - काप्री ग्लोबल

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com