India Open : सात पॉझिटिव्ह, खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरू | Seven Players Tested Corona Positive | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Open hit by corona
India Open : सात पॉझिटिव्ह, खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरू

India Open : सात पॉझिटिव्ह, खेळाडूंच्या माघारीचे सत्र सुरू

इंडिया ओपन (India Open) बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे. सात भारतीय बॅडमिंटनपटूंना कोरोनाची लागण झाल्याने स्पर्धा स्थगित करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्य पदक विजेता श्रीकांतने (Kidambi Srikanth) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली होती. श्रीकांत पाठोपाठ अश्विनी पोनप्पा, रितिका राहुल ठाकूर, ट्रीसा जॉली, मिथून मंजूनाथ, सिमरन अमन सिंह आणि खुशी गुप्ता यांनी देखील स्पर्धेतून माघार घेतली आहे.

हेही वाचा: जयंत, नवदीप भारताच्या ‘वन डे’ संघात

याबाबत समितीने सांगितले की, 'खेळाडूंची आरटी पीसीआर चाचणी (RT - PCR Test) घेण्यात आल्यानंतर अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दुहेरीतील खेळाडूंचा जवळून संपर्क येतो. त्यामुळे सात खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. अनेक ड्रॉ मधील खेळाडू रिप्लेस केलेले नाही त्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला बाय मिळाला असून ते पुढच्या फेरीत गेले आहेत.'

हेही वाचा: अ‍ॅशेस हरली इंग्लंड शिक्षा मात्र राजस्थान रॉयल्सला?

सिक्की रेड्डी, ध्रुव कपिला, गायत्री गोपीचंद, अक्षन शेट्टी आणि काव्या गुप्ता या खेळाडूंनीही चाचणी पॉझिटिव्ह आली नसताना स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यांनी दुहेरीत खेळाडूबरोबर जवळून संपर्क येतो त्यामुळे माघार घेतली आहे. त्यामुळे दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात खेळाडूंची कमतरता जाणवत आहे. असे असले तरी सध्या तरी स्पर्धा सुरु असून भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (P.V. Sindhu), सायना नेहवाल (Saina Nehwal) स्पर्धेत खेळत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top