
महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा पुण्यात खेळवण्यात येणार : जय शहा
मुंबई : बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी आज महिला टी 20 चॅलेंज (The Women T20 Challenge) स्पर्धेबाबत महत्वाची घोषणा केली. त्यांनी महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा ही 23 ते 28 मे दरम्यान पुण्यात (Pune) खेळवण्यात येणार असल्याची माहिती दिली. कोरोनामुळे महिला टी 20 चॅलेंज स्पर्धा ही खेळवण्यात आली नव्हती.
हेही वाचा: वडील घरोघरी पोहोचवतात सिलिंडर, भाऊ ऑटोचालक; 9 वी नापास रिंकू सिंगची कहाणी
महिला टी 20 चॅलेंज स्पर्धेचा चौथा हंगाम हा पुण्यात आयोजित केला जाणार आहे. हा हंगामातील सामने 23 मे, 24 मे, 26 रोजी होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना हा 28 मेला होणार आहे. जय शहा यांनी याचबरोबर आयपीएलचे प्ले ऑफ हे अहमदाबाद आणि कोलकाता या दोन ठिकाणी होणार असल्याची देखील माहिती दिली. याचबरोबर आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियवर होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा: IPL सोडून चहलच्या बायकोकडेच नजरा; पाहा तिचा HOT अंदाज
आयपीएलच्या प्ले ऑफमधील क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर हे इडन गार्डवर 24 आणि 25 मेला होणार आङे. यानंतर क्वालिफाय 2 27 मे आणि फायनल 29 मेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
Web Title: The Women T20 Challenge Will Be Healed In Pune During 23rd To 28th May Say Jay Shah
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..