esakal | क्रिकेटच्या पंढरीत कधी सुरू होणार क्रिकेटची वारी; 'ही' स्पर्धा झाली जवळपास रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

cricket

मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीची आज बैठक होती, त्यात प्रभारी क्रिकेट सुधार समिती निवडली जाणार होती; पण सध्या काही क्रिकेट नसताना तसेच देशांतर्गत क्रिकेट कधी सुरू होणार, याबाबत अनिश्‍चितता असताना समितीची निवड करून काय साधणार, असा विचार करून ही निवड लांबणीवर टाकली असल्याचे सांगितले

क्रिकेटच्या पंढरीत कधी सुरू होणार क्रिकेटची वारी; 'ही' स्पर्धा झाली जवळपास रद्द

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई ः भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या कांगा क्रिकेटचा कोरोनामुळे बळी जाणार, हे जवळपास निश्‍चित झाले आहे. मुंबई क्रिकेट संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी  क्रिकेट कधी सुरू होणार, याबाबत अनिश्‍चितता असल्यामुळे पावसातील क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेली कांगा स्पर्धा न होताच मोसम संपवणे भाग पडणार असल्याची चर्चा आहे.

वाचा ः सोनू सूद आणि उद्धव ठाकरे यांच्यात 'त्या' रात्री मातोश्रीवर काय झाली होती चर्चा? वाचा... 

मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारिणीची आज बैठक होती, त्यात प्रभारी क्रिकेट सुधार समिती निवडली जाणार होती; पण सध्या काही क्रिकेट नसताना तसेच देशांतर्गत क्रिकेट कधी सुरू होणार, याबाबत अनिश्‍चितता असताना समितीची निवड करून काय साधणार, असा विचार करून ही निवड लांबणीवर टाकली असल्याचे सांगितले; मात्र समितीच्या बैठकीनंतर शाह आलम शेख यांनी या समितीचा निर्णय वार्षिक सभा घेत असते. कार्यकारिणीस प्रभारी समितीचीही निवड करता येत नाही, त्याबाबत घटनेत कोणतीही तरतूद नाही, असे सांगितले. कार्यकारिणीची दोन महिने बैठक झाली नव्हती. त्याचबरोबर काही फेरकरारही करायचे होते, त्याचे निर्णय या बैठकीत झाले, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी या बैठकीस आठ जण प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाल्याचे सांगितले.

वाचा ः धक्कादायक! मुंबई महापालिका उपायुक्तांचं कोरोनानं निधन...

अर्थात या बैठकीस उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील क्रिकेट सुरू होण्याबाबत अनिश्‍चितता असल्याचेच सांगितले. जूनच्या अखेरपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर काय असेल, हे माहिती नाही. त्याचबरोबर मोसम सुरू करण्याबाबत भारतीय क्रिकेट मंडळानेही काहीही ठरवले नाही. त्यामुळे मोसम ऑगस्टमध्ये सुरू होणार की ऑक्‍टोबर - नोव्हेंबरमध्ये, याबाबत काहीच कल्पना नाही. त्यामुळे कांगा लीग यंदा होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. कांगा लीग १५ जुलैच्या आसपास दर वर्षी सुरू होते आणि अजूनही स्टेडियम तसेच खुल्या मैदानात खेळण्याबाबतचे संकेत जाहीर झालेले नाहीत. अजून क्रिकेट सुरू करण्याबाबत परवानगी दिलेली नाही. या परिस्थितीत दर वर्षीची लीग कशी होणार. तिच्याविनाच यंदाचा मोसम संपणार, असे संघटनेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा  ः मन हेलावणारी बातमी! मृत्यू दाखला देण्यास नकार, तब्बल 16 तास मृतदेह घरात

कांगा लीग घेण्यासाठी त्याची पूर्वतयारी करावी लागते. ती ऑक्‍टोबरमध्ये संपते आणि त्याच सुमारास अन्य स्पर्धा सुरू होतात. हीच काय, कुठलीच क्रिकेट स्पर्धा कधी सुरू होणार, हे सांगता येत नाही. संघटनेच्या बैठकीत याबाबत चर्चाही झाली नाही, त्यावरूनच सर्व काही लक्षात येईल. मोसमाच्या प्रारंभाबाबत अनिश्‍चितता असताना त्याबाबत काय बोलणार, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. माझ्या आठवणीनुसार १९८३-८४ च्या मोसमात केवळ चार फेऱ्या झाल्या होत्या; पण मुंबई क्रिकेट इतिहासात प्रथमच कांगा लीग रद्द होण्याचा निर्णय होईल. मुंबईतील क्रिकेट स्पर्धा किंवा सराव कधी सुरू होणार याबाबतचा निर्णय आम्ही नव्हे, सरकार घेणार असल्याचे अन्य एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


क्रिकेट कधी सुरू होईल, हेच सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये सुरक्षित अंतर कसे राखणार, हे सर्व ठरल्यावर खेळ सुरू होण्याबाबत चर्चा होईल. लॉकडाऊन संपल्यावर क्रिकेट सुरू करण्याबाबत सरकार सांगेल, त्यावेळच्या परिस्थितीनुसार स्पर्धा सुरू करण्याबाबत निर्णय होईल.
- शाह आलम शेख, मुंबई क्रिकेट संघटनेचे सहसचिव