esakal | Olympic: जगातील मानाच्या स्पर्धेवेळी प्रेक्षकांनाही 'मान'
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo 2020

Olympic: जगातील मानाच्या स्पर्धेवेळी प्रेक्षकांनाही 'मान'

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympic 2020 : कोरोनाजन्य परिस्थितीच्या संकटातून जग हळूहळू सावरत आहे. सर्व गोष्टी पूर्वपदावर येत असताना खेळाची मैदानेही अनलॉक होताना दिसते. कोरोनामुळे स्थगित झालेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली असताना ऑलिम्पिक समितीने एक मोठा निर्णय घेतलाय. 10 हजार पर्यंत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक स्टेडियममधील क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश द्यावा, अशी अटही असेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी नागरिकांवर यापूर्वीच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जगातील मानाची स्पर्धा प्रेक्षकांशिवाय होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण जपानमधील नागरिकांना या स्पर्धेचा आनंद घेण्याचा मार्ग मोकळा झालाय.

23 जुलैपासून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेला शुभारंभ होणार आहे. त्यानंतर पॅराऑलिम्पिक स्पर्धाही टोकियोत नियोजित आहे. 24 ऑगस्टपासून पॅराऑलिम्पिक स्पर्धाला सुरुवात होईल. पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील प्रेक्षकांच्या उपस्थितीबद्दल 16 जुलैला निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर खेळाडू उतरणार ऑलिम्पिकच्या मैदानात

स्पर्धेदरम्यान अधिक गर्दी झाली तर कोरोनाच्या संक्रमणाचा फैलाव होऊ शकतो, अशी भिती जपानमध्ये आहे. त्यामुळे कठोर नियमावली आणि निर्बंधामध्ये टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पार पडणार आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी देखील मागील आठवड्यातच नागरिकांना ऑलिम्पिकसंदर्भात खास आवाहन केले होते. स्टेडियमवर येऊन खेळ पाहण्याऐवजी टेलिव्हिनवरच स्पर्धेचा आनंद घ्या, असे ते म्हणाले होते. ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी रविवारी टोकियोतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून याठिकाणी कठोर निर्बंध होते.

हेही वाचा: WTC INDvsNZ : रिझर्व्ह डे संदर्भात ICC ने घेतला मोठा निर्णय!

जपानमध्ये कशी आहे कोरोनाची परिस्थिती?

जपानमध्ये आजही कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. प्रत्येक दिवशी जवळपास 1, 400 नवे रुग्ण आढळत आहेत. मे महिन्यामध्ये हा आकडा 6000 च्या घरात होता. टोकियोमध्ये कोरोना संक्रणाची आकडा नियंत्रणात असून स्पर्धा सुरळीत पार पडेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. जपानमध्ये 16 टक्के लसीकरण झाले आहे.

loading image