esakal | Olympics : रिंगमध्ये उतरण्यापूर्वीच 4 बॉक्सर पुढच्या फेरीत
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Panghal

Olympics : रिंगमध्ये उतरण्यापूर्वीच 4 बॉक्सर पुढच्या फेरीत

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020: बॉक्सिंगमध्ये 52 किलो वजनी गटातील वर्ल्ड नंबर वन अमित पंघालसह चार जणांना पहिल्या फेरीत खेण्यापूर्वीच विजय (bye ) मिळालाय. गुरुवारी बॉक्सिंगमधील ड्रॉ जाहीर करण्यात आले. भारतातील 9 बॉक्सर यंदा ऑलिम्पिकच्या रिंगणात उतरणार आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये एकाही बॉक्सरला पदक मिळवता आले नव्हते. यावेळी सहभागी झालेल्या खेळाडूंकडून पदकाची आस आहे. (Tokyo Olympics 2020 bye for Top Seeded Amit Panghal And 3 More Overall Draw For Indian Boxers At Olympics)

पहिल्या फेरीत Bye मिळाल्यामुळे आता 31 जुलैला अमित पंघाल प्री क्वार्टर फायनलसाठी रिंगमध्ये उतरेल. त्याची लढत ही बोत्सवानाच्या मोहम्मद रजब ओतुकिले आणि कोलंबियाचा हर्नी रिवास मार्टिनेज यांच्यातील विजेत्याशी होईल.

महिला गटात सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमची 51 किलो वजनी गटातील लढत 25 जुलै रोजी डोमिनिकाची मिगुलिना हर्नानडेज हिच्या विरुद्ध रंगणार आहे. दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या मेरी कोमल पुढच्या फेरीत कोलंबियाच्या तिसऱ्या मानांकित लोरेना विक्टोरिया वेलेंसियाचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा: Olympics : IOA ची मोठी घोषणा, विजेत्यांवर होणार बक्षीसाची बरसात!

आशियाई क्रीडा स्पर्धेतीतल कांस्य पदक विजेता सतीश कुमार याला 91 किलो वजनी गटात पहिल्या फेरीत 'बाय' मिळालीये. सुपर हेवी वेट गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणारा तो पहिला बॉक्सर आहे. प्री क्वार्टर फायनलमध्ये त्याची लढत जमेकाचा रिकार्डो ब्राउनशी होईल. या लढतीतील विजय मिळाला तर त्याला पुढच्या फेरीत त्याच्यासमोर उज्बेकिस्तानच्या अव्वल मानांकित बखादिर जालोलोव याचे आव्हान असू शकते. जालोलोव हा विद्यमान वर्ल्ड चॅम्पियन असून त्याने तीन वेळा आशियाई चॅम्पियनशिपवर कब्जा केलाय.

75 किलो वजनी गटात आशीष चौधरीसमोर पहिल्या फेरीत चीनच्या इरबीके तोहेता याचे आव्हान असेल. राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या मनीष कौशिकला पहिल्या फेरीत (63 किलो वजनी गट) ब्रिटनच्या युरोपियन रौप्य पदक विजेत्या ल्यूक मॅककोरमाक विरुद्ध भिडावे लागेल. या लढतीनंतर त्याच्यासमोरील आव्हान आणखी वाढेल. अंतिम 16 मध्ये त्याला क्यूबाच्या एंडी क्रूजशी टक्कर द्यावी लागेल. तो सध्याच्या घडीला वर्ल्ड चॅम्पियन आहे.

हेही वाचा: Olympics : 'सुपर मॉम'कडून पदकी 'पंच'ची अपेक्षा

69 किलो वजनी गटात विकास कृष्णसमोर जपानच्या मेनसाह ओकाजावाचे आव्हान असेल. या लढतीतील विजयानंतर त्याला तिसऱ्या मानांकित क्यूबाच्या रोनील इग्लेसियासचा सामना करावा लागेल. इग्लेसियासने 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.

महिला गटातील 75 किलो वजनी गटात पूजा रानीला अल्जीरियाच्या इचराक चॅबचा सामना करावा लागेल. या फेरीतून पुढे प्रवास केल्यास तिच्यासमोर जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या ली क्वीयानचे आव्हान असेल. ली 2018 ची वर्ल्ड चॅम्पियन आहे. लवलीना बोरगोहेन हिला 69 किलो वजनी गटातील पहिल्या फेरीत 'बाय' मिळाली आहे. 60 किलो वजनी गटात समिरनजीतलाही बाय मिळालीये. प्री क्वार्टर फायनलमध्ये तिच्यासमोर थायलंडच्या सदापोर्न सीसोनदीचे आव्हान असेल.

loading image