Neeraj Chopra
Neeraj ChopraE Sakal

Video : नीरज म्हणाला, हे गोल्ड माझं नव्हे तर संपूर्ण देशाचं!

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सोनेरी क्षणाची अनुभूती देणाऱ्या नीरज चोप्राने देशवासियांचे आभार मानले.

जपानची राजधानी टोकियोतील ऐतिहासिक कामगिरीनंतर गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा आणि अन्य भारतीय खेळाडूंचा ताफा मायदेशी परतलाय. दिल्लीतील विमानतळावर जंगी स्वागत झाल्यानंर सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यासाठी हॉटेल अशोकामध्ये खाक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्य मंत्री निसिथ प्रमाणिक आणि माजी क्रीडा तसेच विद्यमान कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सोनेरी क्षणाची अनुभूती देणाऱ्या नीरज चोप्राने देशवासियांचे आभार मानले. यावेळी त्याने खिशातील मेडल काढून दाखवत मनाला भिडणाऱ्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. हे गोल्ड मेडल केवळ माझे एकट्याचे नाही तर संपूर्ण देशाच आहे, असे तो म्हणाला. शतकाच्या प्रतिक्षेनंतर एखाद्या अ‍ॅथलेटिक्सने ऑलिम्पिकमध्ये देशासाठी गोल्डन कामगिरी करुन दाखवलीये. या यशाचे राज सांगताना नीरजने देशवासियांना खास संदेशही दिलाय.

Neeraj Chopra
'गोल्ड' पटकावणाऱ्या 'नीरज'चं पुण्याशी असलेलं कनेक्शन माहितीय का?

तो म्हणाला की, "माझ्या गटात वर्ल्ड क्लास खेळाडू होते. वर्ल्ड रँकिंगमध्ये मी चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे स्पर्धा निश्चितच सोपी नव्हती. पात्रता फेरीत अव्वलस्थानी राहिल्यामुळे आत्मविश्वास उंचावला. प्रतिस्पर्ध्याला न घाबरता तुम्ही 100 टक्के दिले तर यश दूर नसते. याचा अनुभवच या स्पर्धेतून मिळाला." असे सांगत त्याने प्रतिस्पर्ध्याचा विचार न करता स्वत:मधील बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, असा मोलाचा सल्लाही दिलाय.

Neeraj Chopra
डोळ्यातून अश्रू आले नाहीत, पण त्यावेळी मी खूप भावूक झालो होतो - नीरज चोप्रा

नीरज चोप्राने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 87.58 मीटर एवढे अंतर कापल्यानंतर त्याच्यात कमालीचा आत्मविश्वास दिसला होता. यावरही त्याला प्रश्न विचारण्यात आला. ज्या प्रयत्नाने गोल्ड निश्चत झाले त्यावर नीरज म्हणाला की, दुसऱ्या प्रयत्नात फेकलेला भाला कारकिर्दीत सर्वोत्तम असेल, असे वाटले होते. पण तो थोडा कमीच पडला. पण ही कामगिरी गोल्ड मिळवून देणारी ठरली, ही गोष्ट आनंदाची आहे, असे तो म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com