Olympics: लोविनाच्या जोरदार 'ठोशा'नं भारताला पदकाची आशा!

अंतिम 8 खेळाडूंमध्ये जागा पक्की करणारी ती भारताची पहिली बॉक्सर ठरलीये.
Lovlina Borgohain
Lovlina BorgohainTwitter

ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच बॉक्सिंग रिंगमध्ये उतरलेल्या लोविना बोरोगोहेन लक्षवेधी कामगिरी केलीये. महिला गटातील 69 किलो वजनी गटात तिने जर्मनच्या तगड्या अनुभवी नेदिन एपेट्जला पराभवाचा धक्का दिला. तिचा हा विजय बॉक्सिंगमध्ये पदकाची आशा पल्लवित करणारा आहे. विरुद्धच्या कडव्या लढतीत विजय नोंदवत पदकाच्या अपेक्षा उंचावल्या. भारताच्या 23 वर्षीय महिला बॉक्सरने आपल्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या आणि दिग्गज प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 3-2 असा विजय नोंदवला. (Tokyo Olympics 2020 Indian Boxer Lovlina Borgohain Defeated Germany Nadine Apetzenters And Quarter Final)

भारतीय बॉक्सिंग संघातून अंतिम 8 खेळाडूंमध्ये जागा पक्की करणारी ती भारताची पहिली बॉक्सर ठरलीये. पुढच्या फेरीत 30 जुलैला तिच्यासमोर चीनी तायपे निएन चिन चेन हिचे आव्हान असेल. तिने जर या सामन्यात विजयी पंच मारला तर बॉक्सिंगमधील भारताचे एक पदक निश्चित होईल.

Lovlina Borgohain
माहीचा लेटेस्ट फोटो नीट बघा; थोडा जाडा दिसतोय ना!

लोविना हिने ज्या जर्मनी खेळाडूचा पराभ केला ती ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा खेळत असली तरी तिच्याकडे तगडा अनुभव होता. 35 वर्षीय नेदिन एपेट्जने वर्ल्ड चॅम्पियनशिप बॉक्सिंग स्पर्धेत दोन वेळा कांस्य पदकाची कमाई केलीये. ती माजी युरोपियन चॅम्पियनही आहे. मोठा अनुभव आणि उल्लेखनिय कामगिरी नोंदवलेल्या खेळाडूला पराभूत करुन लोविनाने आपल्यात पदक जिंकण्याची क्षमता असल्याचेच दाखवून दिले. लोविना हिने बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये एकदा कांस्य पदकाची कमाई केलीये.

स्पर्धेतील प्रवास कायम राखण्यासाठी लोविनाला द्यावी लागेल तगडी फाईट

चेन 2019 आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधील रौप्य पदक विजेती आहे. तिने प्री क्वार्टर फायनलमध्ये इटलीच्या अँजेला करिनी हिला 3-2 अशी मात दिलीये. आसामची लोविना हिने जर्मनी खेळाडूच्या विरोधात कमालीची रणनिती आखल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीला तिने आक्रमण केले. त्यानंतर तिने संधीची वाट पाहिली. तिची ही रणनिती यशस्वी ठरली.

Lovlina Borgohain
डिप्रेशनमधून सावरली; पण घरातच गोल्डन स्वप्नाला सुरुंग

जर्मनी प्रतिस्पर्धीने आपल्या अचूक पंचनी लोविनासमोर आव्हान निर्माण केले. पण अखेर भारतीय बॉक्सरने आपल्यातील कसब पणाला लावून सामना खिशात घातला. लोविनाने डावखुऱ्या हाताने लगावलेले पंच पाहण्याजोगे होते. पुढच्या सामन्यात ती आपल्या या खेळीत आणखी सुधारणा करुन पदकाच्या दिशेने पाऊल टाकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलेली जर्मनीची एपेट्ज ही नावजलेल्या महिला बॉक्सरपैकी एक आहे. ती न्यूरो सायन्समध्ये PHD करत असून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तिने एक वर्षांचा ब्रेक घेतला होता. मागील वर्षीच्या युरोपिया क्वालिफिकेशन स्पर्धेत तिने दमदार कामगिरी करुन दाखवत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com