घरी पोहचताच मिळाला पिझ्झा; मीराबाई चानूची पोस्ट व्हायरल

ऑलिम्पिक स्पर्धेतील वजनदार कामगिरी करुन मीराबाई चानू मायदेशी परतलीये
mirabai chanu
mirabai chanu twitter

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाला एकमेव मेडल मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू मायदेशी परतलीये. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच चानूने रौप्य पदकाची कमाई करत देशाकडून पदकाचे खाते उघडले होते. वेटलिफ्टिंगमधील 21 वर्षांचा दुष्काळ संपवत नवा विक्रम रचणाऱ्या मीराबाईचे देशभरात कौतुक होत आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील वजनदार कामगिरीनंतर राज्य सरकारकडून तिच्यावर बक्षीसांची खैरात झाली. सरकारकडून रोख बक्षीस आणि सरकारी नोकरीची ऑफरही तिला देण्यात आली. यात आणखी एका खास बक्षीसाचा समावेश होता. तो म्हणजे डॉमिनोज इंडियाने तिला आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देण्याची घोषणा केली. (tokyo olympics 2020 silver medalist mirabai chanu thanks to dominos india after get pizza)

mirabai chanu
ऑलिम्पिक दरम्यान टोकियोत कोरोना रुग्णांचा आकडा झाला दुप्पट

मंगळवारी मीराबाई चानूने ट्विटरच्या माध्यमातून डॉमिनोज इंडियाचे आभार मानले आहेत. मीराबाई चानूने अधिकृत अकाउंटवरुन दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत डॉमिनोज डिलिव्हरी बॉय मीराबाई चानूसह तिच्या कुटुंबियांना पिझ्झा डिलिव्हरी करतानाचे चित्र पाहायला मिळते. सर्वोत्तम आणि टेस्टी पिझ्झा पाठवून आनंदात सहभागी झाल्याबद्दल डॉमिनोज इंडियाचे खूप खूप आभार. माझ्यासह कुटुंबियाकडून या निर्णायचे स्वागत करते. आपले मैत्रीचे नाते कायम राहील, असा उल्लेख मीराबाई चानूने आपल्या ट्विटमध्ये केलाय. मीराबाई चानूने नुकतेच एका मुलाखतीमध्ये पिझ्झा खाण्याची मनातील भावना व्यक्त केली होती. तिचे हे शब्द लक्षात ठेवत चंदेरी कामगिरी करणाऱ्या मीराबाई चानूसाठी डॉमिनोज इंडियाने अनोखा आणि सर्वांच्या भुवय्या उंचावणाऱ्या निर्णायाची घोषणा केली होती.

mirabai chanu
Olympics: लोविनाच्या जोरदार 'ठोशा'नं भारताला पदकाची आशा!

चंदेरी कामगिरीनंतर मीराबाई चानूला पोलिस विभागात नोकरी देणार असल्याची घोषणा मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी केली होती. याशिवाय जगातील मानाच्या स्पर्धेत रौप्य कामगिरी केल्याबद्दल चानूला राज्य सरकारकडून 1 1 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात दिले जाणार आहेत. मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारातील 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकवणाऱ्या ऑलिम्पियन चॅम्पियन मीराबाई चानूची अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर नियुक्त देणार असल्याची माहिती दिली होती. एवढेच नाही तर राज्यात जागतिक दर्जाची वेटलिफ्टिंग अकादमी सुरु करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com