ऑलिम्पिक दरम्यान टोकियोत कोरोना रुग्णांचा आकडा झाला दुप्पट

मागील आठवड्यातील मंगळवारी टोकियोतील कोरोना रुग्णाचा आकडा हा 1 हजार 387 इतका होता.
Tokyo Corona
Tokyo CoronaFile Photo

जगातील मानाची स्पर्धा सुरु असलेल्या जपानच्या राजधानीत कोरोनाचा आकडा वाढताना दिसतोय. ऑलिम्पिक स्पर्धा सुरु झाल्यापासून मंगळवारपर्यंत टोकियोत कोरोनाचे 2 हजार 848 नवे रुग्ण आढळले आहेत. 7 जानेवारी 2021 पासूनचा हा सर्वोच्च आकडा आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांचा आकडा दुप्पटीने वाढलाय. स्थानिक प्रसारमाध्यमातील रिपोर्टनुसार, मागील आठवड्यातील मंगळवारी टोकियोतील कोरोना रुग्णाचा आकडा हा 1 हजार 387 इतका होता. आठवड्याभरात यात दुप्पट वाढ नोंदवली गेलीये. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी टोकियोमध्ये चौथ्यांदा आपतकालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आलीये. (Tokyo Reports High Of 2848 New Covid 19 Cases Days After-Start Of Olympics 2020)

एका बाजूला ऑलिम्पिक स्पर्धा सुरु असताना दुसऱ्या बाजूला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पाउल उचचली जात आहेत. ऑलिम्पिकला सुरुवात होण्यापूर्वीच जपानमध्ये आपतकालीन परिस्थिती लागू करण्यात आली आहे. पॅराऑलिम्पिक दरम्यान याचा अवधी पुन्हा वाढणार का? असा प्रश्न वाढत्या रुग्ण संख्येमुळे निर्माण झाला आहे. मागील आठवड्यातील शुक्रवारपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालीये. स्पर्धेदरम्यान कोरोनाचा अधिक प्रसार होऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले होते. त्यामुळे विशेष खबरदारीसह स्पर्धा पार पडत आहे. त्यासाठी आयोजकांनी चांगलीच कंबर कसलीये. सध्याच्या घडीला लसीकरण झालेले नसलेल्या आणि कमी वयाच्या लोकांमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

Tokyo Corona
Olympics: लोविनाच्या जोरदार 'ठोशा'नं भारताला पदकाची आशा!

लशीच्या तुटवड्यामुळे जपानमधील लसीकरण मोहिमेची गती मंदावल्यामुळे यात आणखी भर पडताना दिसते. कोरोनाच्या गंभीर रुग्णांमध्ये पन्नाशीच्या आसपास असलेल्या लोकांचा आकडा अधिक आहे. टोकियोतील रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांचा आकडा वेगाने वाढत असून तो जवळपास 3 हजारच्या घरात पोहचलाय. यामुळे रुग्णालयात बेड्सचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णालयातील बेड्सची संख्या 6 हजारपर्यंत करण्याचा आदेश प्रशासनाकडून दिले जाऊ शकतात.

Tokyo Corona
माहीचा लेटेस्ट फोटो नीट बघा; थोडा जाडा दिसतोय ना!

सरकारी आकडेवारीनुसार, जपानच्या लोकसंख्येच्या 25.5 टक्के नागरिकांनी कोरोना लशीची दोन्ही डोस घेतले आहेत. इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा सामना सक्षम करणाऱ्या राष्ट्रांपैकी जपान एक आहे. सध्याच्या घडीला देशातील वाढता आकडा हा तिसऱ्या लाटेची चाहूल देणारा असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन ऑलिम्पिकला प्राधान्य दिले जात असल्याची टीकाही याठिकाणी करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com