esakal | मीराबाई चानूच्या कानातील 'ऑलिम्पिक रिंग'ची इमोशनल कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

mirabai chanu

मीराबाई चानूच्या कानातील 'ऑलिम्पिक रिंग'ची इमोशनल कहाणी

sakal_logo
By
सुशांत जाधव

जगातील मानाच्या स्पर्धेत भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने अभिमानास्पद कामगिरी केली. 49 किलो वजनी गटात तिने दुसऱ्या दिवशी भारताच्या पदकाचे खाते उघडले. तिने स्नॅच प्रकारासह क्लिन आणि जर्कमध्ये मिळून 202 किलो वजन उचलत रौप्य पदकाची कमाई केली. या कामगिरीसह चानूने 21 वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक मिळवून दिले. (tokyo olympics 2020 silver medalist mirabai chanu wears good luck earrings gifted by her mother during rio 2016 olympics)

तिच्या या पदकाच्या जोरावर पदतालिकेत भारत संयुक्तरित्या 12 व्या स्थानावर आहे. चीनने 3 सुवर्णासह चार पदकासह अव्वलस्थानी आहे. कर्णम मल्लेश्वरीनंतर वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळवून देणारी चानू दुसरी महिला वेटलिफ्टर आहे. मल्लेश्वरीने 2000 मध्ये सिडनी ओलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती.

हेही वाचा: Olympics : इतिहास रचणारी चानू कधीकाळी लाकडाच्या मोळ्या उचलायची

मीराबाई चानूने चंदेरी कामगिरी केल्यानंतर तिच्या कानातील इअर रिंग्सची चर्चा रंगलीये. मीराबाई चानूच्या कानातील रिंग्ज ऑलिम्पिकचे प्रतिक असलेल्या पाच रिंगची डिझाईनचे आहे. पाच वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिवेळी तिच्या आईने आपले दागिने विकून हे इअर रिंग्ज चानूला गिफ्ट दिले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये या इयर रिंग मीराबाईसाठी लकी ठरतील, असा विश्वास तोम्बी लीमा (मीराबाई चानूची आई) यांना होता.

हेही वाचा: मणिपूर सरकारचं चानूला 1 कोटीचं बक्षीस, मुख्यमंत्र्यांची घोषणा

लेकीनं चंदेरी कामगिरी केल्यानंतर तोम्बी लीमा यांनी पीटीआयला या रिंग्जमागची इमोशनल कहाणी शेअर केलीये. त्या म्हणाल्या की, टेलिव्हिजनवर इवेंट पाहत असताना तिने इयर रिंग्ज घातल्याचे पाहिले. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकपूर्वी या रिंग्ज मी गिफ्ट दिल्या होत्या. माझ्याकडील सोने आणि बचत केलेल्या पैशातून ही खास डिझाईन करुन घेतली होती. गिफ्ट घातेलल्या रिंग्ज घालून ती ज्यावेळी मैदानात उतरली तेव्हा अश्रू अनावर झाले होते, असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top