Olympics INDvsGBR Hockey : ब्राँझसाठीची 'ग्रेट' मॅच 'ब्रिटन'ची

दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने तीन गोल डागून ग्रेट ब्रिटनला अडचणीत आणले होते.
Great Britain vs India
Great Britain vs IndiaTwitter

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट ग्रेट ब्रिटनने कांस्य पदकाच्या लढतीत भारतीय महिला संघाला 4-3 असे पराभूत केले. 2 गोलने पिछाडीवर असलेल्या भारतीय महिला संघाने सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने तीन गोल डागत सामन्याला कलाटणी देणाऱ्या क्षणाची झलक दाखवून दिली.

गुरजीत कौरने दोन तर वंदना कटारियाने एक गोल डागला. 2-0 या पिछाडीवरुन भारतीय महिला संघाने सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने एक गोल डागून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत होते. चौथ्या आणि निर्णायक क्वार्टरमध्ये गत ऑलिम्पिक चॅम्पियन ग्रेट ब्रिटनने चौथा आणि निर्णायक गोल डागला. 46 व्या मिनिटाला भारतीय खेळाडू उदिताला येलो कार्ड मिळाले. त्यामुळे तिला मैदान सोडावे लागले. 48 व्या मिनिटाला ग्रेट ब्रिटनने केलेला गोल सामन्याचा निकाल ठरवणारा ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com