सविता पुनिया: इतिहास रचणाऱ्या भारतीय हॉकी संघाची 'नवी वॉल'

ऑस्ट्रेलियाला आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले. प्रत्येकवेळी तिने...
सविता पुनिया
सविता पुनिया हॉकी इंडिया

टोक्यो: भारतीय महिला हॉकी संघाने (India womens hockey team) सोमवारी इतिहास रचला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला (australia) नमवून प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्यफेरीत प्रवेश केला. ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौर आणि सविता पुनिया (savita punia) भारताच्या विजयाच्या नायक ठरल्या. भारताचा उपांत्यफेरीचा पुढचा सामना बुधवारी अर्जेंटिना (argentina) विरुद्ध होणार आहे. २०१२ नंतर अर्जेंटिनाने प्रथमच जर्मनीचा ३-० ने पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. (Tokyo Olympics Savita Punia the new definition of wall as India stun Australia in womens hockey dmp82)

पहिल्या हाफमध्ये गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर केलेला गोल निर्णायक ठरला. तोच विजयी गोल ठरला. भारताची गोलरक्षक सविता पुनियाने जबरदस्त कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले. प्रत्येकवेळी तिने ऑस्ट्रेलियन महिला हॉकी संघाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारतीय महिला हॉकी संघाच्या या कामगिरीवर सोशल मीडियामधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेटीझन्सनी भारताची 'नवी वॉल' असे सविताचे नामकरण केले आहे.

सविता पुनिया
DRDO ने बनवला होता 'मिरची बॉम्ब'

मागच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ ३६ वर्षांनी पात्र ठरला होता. त्यावेळी साखळी फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. सलग चार पराभव आणि जपान विरुद्ध ड्रॉ अशी भारतीय महिला हॉकी संघाची कामगिरी होती. "रियो मध्ये आमचा अनुभव फारसा चांगला नव्हता. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव तोकडा होता" असे सविताने टोक्याला रवाना होण्यापूर्वी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले होते.

सविता पुनिया
पुरावे नष्ट केल्यामुळे राज कुंद्राला अटक- सरकारी वकील

"रियो भूतकाळ होता आणि टोक्योमधून मेडल घेऊन परतण्याचा आमचा उद्देश आहे. या संघाचा स्वत:वर विश्वास आहे. हा संघ कुठल्याही मोठ्या संघाचा पराभव करु शकतो. आता आमच्यामनात भीती उरलेली नाही" असे सविताने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com