esakal | Paralympic Medal Tally : 5 गोल्डसह इंडिया 24 व्या स्थानावर; चीन 200+
sakal

बोलून बातमी शोधा

Paralympic Medal Tally

Paralympic Medal Tally : 5 गोल्डसह इंडिया 24 व्या स्थानावर; चीन 200+

sakal_logo
By
सुशांत जाधव

जपानची राजधानी असलेल्या टोकियोत सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी नोंदवलीये. टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलनं देशासाठी पहिले रौप्य जिंकले. त्यानंतर अखेरच्या दिवशी बॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरने (Krishna Nagar)सुवर्ण पदकासह भारताला स्पर्धेतील शेवटचे पदक मिळवून दिले. त्याच्या या पदकासह भारताने यंदाच्या स्पर्धेत 5 सुवर्ण पदक पटकावली आहेत.

यातील दोन सुवर्ण पदक ही बॅडमिंटनमधील आहेत. कृष्णासह प्रमोद भगतने (Pramod Bhagat) गोल्डन कामगिरी नोंदवली होती. अवनी लेखारानं (Avani Lekhara) नेमबाजीतील भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले होते. त्यानंतर पुरुष गटातील 50 मीटर पिस्टल प्रकारात मनिष नरवालने (Manish Narwal) सुवर्ण वेध साधला. भालाफेकमध्ये सुमित अंतिलने (Sumit Antil,) सुवर्ण पदक मिळवले होते.

हेही वाचा: Paralympic : भारताचे सुवर्णस्वप्न भंगलं, सुहास यथिराजला रौप्य

टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकासह एकूण 19 पदकांची कमाई केलीये. 5 सुवर्ण पदकासह भारत गुणतालिकेत 24 व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिंकप्रमाणेच पॅरालिंपिकमध्ये चिनी खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. चीनने 95 सुवर्ण, 60 रौप्य आणि 51 कांस्य पदकासह एकूण 206 पदके जिंकली आहेत. त्यांच्यापाठोपाठ ग्रेट ब्रिटन 41 सुवर्ण, 38 रौप्य आणि 45 कांस्य पदकासह 124 पदक कमावली आहेत.

हेही वाचा: Paralympics : मूर्ती लहान पण किर्ती महान; कृष्णाला सुवर्ण

अमेरिकेनेही पॅरालिंपिकमध्ये शंभरहून अधिक पदकांची कमाई केली आहे. त्यांच्या खात्यात 36 सुवर्ण, 36 रौप्य आणि 31 रौप्यसह 103 पदके जमा आहेत. रशियन पॅरालिंपिक कमिटीने 118 पदकासह शंभरी पार केलीये. 36 सुवर्ण, 33 रौप्य आणि 49 कांस्य पदकासह ते अमेरिकेच्या खालोखाल आहेत. नँदरलंड पहिल्या पाचमध्ये आहे. 25 सुवर्ण, 17 रौप्य आणि 17 कांस्य पदकासह त्यांच्या खात्यात एकूण 59 पदके आहेत.

युक्रेन - सुवर्ण- 24, रौप्य-47 , कांस्य- 27

ब्राझील- सुवर्ण-22 , रौप्य-20 , कांस्य- 30

ऑस्ट्रेलिया- सुवर्ण-21 , रौप्य-29 , कांस्य-30

इटली सुवर्ण- 14, रौप्य-29 , कांस्य-26

भारतीय पदक विजेत्यांची संपूर्ण यादी

गोल्ड मेडलिस्ट

अवनी लेखारा (नेमबाजी) महिला गटातील R2 10 मीटर एअर रायफल SH 1 क्रीडा प्रकारात सुवर्ण

सुमीत अंतिल (भालाफेक) पुरुष गटातील F64 क्रीडा प्रकारात सुवर्ण

मनिष नरवाल (नेमबाजी) पुरुष गटातील मिक्स्ड P4 50 मीटर पिस्टल SH 1 क्रीडा प्रकारात सुवर्ण

प्रमोद भगत (बॅडमिंटन) पुरुष गटात एकेरीतील SL 3 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक

कृष्णा नागर (बॅडमिंटन) पुरुष गटातील एकेरीतील SH 6 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक

सिल्वर मेडलिस्ट

भाविना पटेल (टेबल टेनिस) महिला गटातील एकेरीत क्लास 4 क्रीडा प्रकारात रौप्य

निशाद कुमार (उंच उडी) पुरुष गटातील T47 क्रीडा प्रकारात रौप्य

योगेश काथुनिया (थाळी फेक) पुरुष गटातील F56 क्रीडा प्रकारात रौप्य

देवेंद्र झाझेरिया (भालाफेक) पुरुष गटातील F46 क्रीडा प्रकारात रौप्य

मरिय्यपन थंगवलु (उंच उडी) पुरुष गटातील T63 क्रीडा प्रकारात रौप्य

प्रवीण कुमार (उंच उडी) पुरुष गटातील T64 क्रीडा प्रकारात रौप्य

सिंहराज अधाना (नेमबाजी) पुरुष गटात मिक्स्ड P4 50 मीटर पिस्टल SH 1 क्रीडा प्रकारात रौप्य

सुहास यथिराज (बॅडमिंटन) पुरुष गटातील SL 4 क्रीडा प्रकारात रौप्य

ब्राँझ मेडलिस्ट

सुंदर सिंग गुर्जर (भालाफेक) पुरुष गटातील F46 क्रीडा प्रकारात कांस्य

सिंहराज अधाना (नेमबाजी) पुरुष गटातील P1 10 मीटर एअर पिस्टल SH 1 क्रीडा प्रकारात कांस्य

शरद कुमार (उंच उडी) पुरुष गटातील T63 क्रीडा प्रकारात कांस्य

अवनी लेखारा (नेमबाज) महिला गटातील R8 50 मीटर रायफल थ्री पोझिशन SH 1 क्रीडा प्रकारात कांस्य

हरविंदर सिंग (तिरंदाजी) पुरुष गटातील रिकर्व क्रीडा प्रकारात कांस्य

मनोज सरकार (बॅडमिंटन) पुरुष गटातील SL3 क्रीडा प्रकारात कांस्य

loading image
go to top