esakal | पॅरालिंपिक गोल्डन बॉय प्रमोदला 6 कोटीसह मिळणार सरकारी नोकरी
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमोद भगत (बॅडमिंटन) पुरुष गटात एकेरीतील SL 3 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक

पॅरालिंपिक गोल्डन बॉय प्रमोदला 6 कोटीसह मिळणार सरकारी नोकरी

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Paralympics 2020 : पॅरालिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवणाऱ्या बॅडमिंटनपटू प्रमोद भगतला ओडिशा राज्य सरकारने मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. 6 कोटी रुपये बक्षीसासोबतच त्याला अ श्रेणीतील सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

राज्य क्रीडा विभागाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पॅरा-बॅडमिंटनमध्ये गोल्डन कामगिरी करणारा प्रमोद 6 कोटी रुपयांच्या पुरस्कारासाठी पात्र ठरला आहे. भुवनेश्वरमध्ये परतल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याला 6 कोटींचा धनादेश (Cheque) देण्यात येईल, याशिवाय त्याला अ श्रेणीतील सरकारी नोकरीत रुजू करुन घेण्यात येईल.

हेही वाचा: ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

ओडिशा राज्य सरकार खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी कटिबद्ध आहे. यापूर्वी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ऑलिम्पिक आणि पॅरालिंपिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ओडिशातील खेळाडूंशी संवादही साधला होता. राज्यातील खेळाडूंना शुभेच्छा देताना त्यांनी सुवर्ण पदक विजेत्याला 6 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 4 कोटी आणि कांस्य पदक विजेत्याला 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. प्रमोद भगतपूर्वी राज्य सरकारने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य असलेल्या बीरेंद्र लाकडा आणि अमित रोहिदास यांना 2.5 कोटीचा धनादेश दिला आहे.

हेही वाचा: T20 WC Squad : अश्विनच्या सरप्राईज एन्ट्री मागचं कारण...

बॅडमिंटनच्या पुरुष एकेरीतील SL 3 गटात प्रमोद भगतने सुवर्ण कामगिरी करुन इतिहास रचला होता. बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिले सुवर्ण आहे. याच गटात एम सरकारने कांस्य पदकाची कमाई केली होती. यंदाच्या पॅरालिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. प्रमोद भगतच्या सुवर्ण पदकासह भारताने 5 सुवर्ण पदकासह 19 पदके मिळवली आहेत.

loading image
go to top