esakal | Paralympics : सोन्या-चांदीची कमाई करणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधीचं बक्षीस
sakal

बोलून बातमी शोधा

Singhraj Adhana and Manish Narwal

Paralympics : सोन्या-चांदीची कमाई करणाऱ्या खेळाडूंना कोट्यवधीचं बक्षीस

sakal_logo
By
सुशांत जाधव

टोकियो पॅरालिंपिक (Tokyo Paralympics) स्पर्धेतील नेमबाजीत पदकी निशाणा साधणाऱ्या दोन खेळाडूंना हरियाणा सरकारने (Haryana Government) 10 कोटींच्या बक्षीसाची घोषणा केलीये. नेमबाजीतील 50 मीटर पिस्टल SH 1 क्रीडा प्रकारात देशासाठी गोल्डन कामगिरी करणाऱ्या मनीष नरवाल 6 कोटी तर याच क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई करणाऱ्या सिंहराज अधाना याला 4 कोटी रुपये बक्षीस स्वरुपात मिळणार आहेत.

19 वर्षीय नरवालने पॅरालंपिकमध्ये 218.2 गुणासंह नवा विक्रम प्रस्थापित केले आहे. अधानाने 216.7 गुणांसह रौप्य पदक कमावले होते. दोन्ही नेमबाज हरियाणातील फरीदाबाद येथील रहिवासी आहेत. या दोन नेमबााजांच्या पदकानंतर भारताच्या पदकाचा आकडा 15 वर पोहचला. भारताने आतापर्यंत 3 सुवर्ण 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकाचीं कमाई केली. सिंहराज याचे हे दुसरे पदक असून यापूर्वी 10 मीटर एअर पिस्टल SH 1 क्रीडा प्रकारात त्याने कांस्य पदकाची कमाई केली होती.

हेही वाचा: IND vs ENG : अँडरसनची नॉट आउट सेंच्युरी! सचिनलाही टाकलं मागे

सुवर्ण कामगिरीनंतर मनिष नरवाल याने आनंद व्यक्त केलाय. नरवाल 2016 पासून शुटिंग रेजवर जाण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच त्याला या क्रीडा प्रकारात आवड निर्माण झाली. पॅरालिंपिक स्पर्धेबद्दल त्याला काहीच माहिती नव्हते. पण तो नियमित सराव करायचा. कोच जयप्रकाश यांनी त्याच्यातील क्षमता ओळखली. 2017 मध्ये बँकॉक जागतिक स्पर्धेत त्याने प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत एअर पिस्टल SH 1 क्रीडा प्रकारात त्याने सुवर्ण कागगिरी केली होती.

सिंहराज अधाना याने देखील दुसऱ्या पदकानंतर खास प्रतिक्रिया दिली. तिसऱ्या स्थानावर असताना मनात दुसरे काहीच येत नव्हते. मी फक्त अन् फक्त टार्गेटवर लक्ष केंद्रीत केल्याचे सिंहराज अधानाने सांगितले. यासोबत शुटींगवेळी घातलेल्या कॅपचे राजही त्याने सांगितले. ही कॅप माझ्या पत्नीने गिफ्ट दिलीये. ती माझ्यासाठी लकी ठरतीये, असा किस्साही त्याने शेअर केला.

हेही वाचा: Paralympics : मनिष नरवालचा सुवर्ण वेध; सिंहराजलाही रौप्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही अभिनंदन!

पॅरालिंपिकच्या नेमबाजीतील एकाच प्रकारात दोन पदके मिळवून देणाऱ्या हरियाणाच्या दोन्ही नेमबाजांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंद केले आहे. मनिष नरवालची सुवर्ण कामगिरी देशासाठी विशेष क्षण आहे. यासोबतच मोदींनी अधाना याच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांनी भविष्यातील प्रवासासाठी दोघांना शुभेच्छा दिल्या.

loading image
go to top