कोरोनाने इंग्लंडनंतर आता ऑस्ट्रेलियाचा 'बायो बबल' भेदला

Travis Head
Travis Headesakal

सिडनी : ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England Cricket Team) यांच्यात सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत (Ashes Series) ऑस्ट्रेलियाने ३ - ० अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया ज्या प्रकारे खेळत आहे ते पाहता त्यांचा इरादा इंग्लंडला क्लीन स्विप देण्याचा दिसतो. मात्र एका बाजूला विजयाचा धडाका सुरु असतानाच अ‍ॅशेस मालिकेवर कोरोनाचे ढग गडद झाले. इंग्लंडच्या सपोर्ट स्टाफपासून सुरु झालेला कोरोना पॉझिटिव्हचा (Corona virus) सिलसिला आता ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड (Travis Head) पर्यंत पोहचला आहे.

Travis Head
भारताविरुद्ध पराभव जिव्हारी; दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडुने घेतली निवृत्ती

मेलबर्नच्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघ सिडनी कसोटीच्या (Sydney Cricket Ground) तयारीला लागला होता. मात्र या पूर्वीच संघाला मोठा धक्का बसला. मधल्या फळीतील फलंजा ड्रॅव्हिस हेडचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यापूर्वी इंग्लंड संघातील सपोर्ट स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह येत होता. पण, आता संघातील खेळाडूलाच कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

ट्रॅव्हिस हेड अ‍ॅशेस मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने गाबा कसोटीत १४८ चेंडूत १५२ धावांची आक्रमक खेळी केली होती. यात त्याने १४ चौकार आणि ४ षटतकार मारले होते. ट्रॅव्हिस हेडने अ‍ॅशेस मालिकेत आतापर्यंत तीन सामन्यात २४८ धावा केल्या आहेत. यात एका शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

Travis Head
इंग्लंडचे प्रशिक्षक विलगीकरणात, संघातील कोरोनाग्रस्त वाढले

अ‍ॅशेस मालिकेत कोरोनाने सर्वात प्रथम इंग्लंड क्रिकेट संघाचा बायो बबल (bio bubble cricket) भेदला होता. इंग्लंड संघातील सपोर्ट स्टाफ आणि काही कुटुंबीय कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर ही संख्या वाढत सात पर्यंत पोहचली आहे. दरम्यान, इंग्लंडचे प्रशिक्षक सिल्वरवूड (Chris Silverwood) हेच कोरोनाच्या विळख्यात अडकले. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना (chris silverwood wife) विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ते मेलबर्नमध्येच विलगीकरणात राहणार आहे. त्यामुळे ते सिडनी कसोटीत संघाबरोबर नसाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com