अभिनवच्या मुलींची तिहेरी सुवर्ण उडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पुणे - ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अभिनव इंग्रजी माध्यम प्रशालेच्या मुलींनी आपली छाप पाडली. सणस मैदानावर रविवारी झालेल्या विविध स्पर्धा प्रकारांत अभिनवच्या मुलींनी १६ वर्षांखालील वयोगटात तीन सुवर्णपदकांची कमाई केली.

पुणे - ॲथलेटिक्‍स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अभिनव इंग्रजी माध्यम प्रशालेच्या मुलींनी आपली छाप पाडली. सणस मैदानावर रविवारी झालेल्या विविध स्पर्धा प्रकारांत अभिनवच्या मुलींनी १६ वर्षांखालील वयोगटात तीन सुवर्णपदकांची कमाई केली.

यामध्ये त्यांच्या रिले चमूसह अनुष्का गुजर आणि ईरा देवकुले यांचा समावेश होता.
अभिनवच्या रिले चमूने मुलींची ४ बाय १०० मीटर शर्यत ५५.३५ सेकंद अशी वेळ देताना जिंकली. त्यांच्या संघात सना रेगे, अनुष्का गुजर, ईरा देवकुले, जाई केळकर यांचा समावेश होता. त्यांनी पिंपरीच्या विद्यानिकेतन प्रशालेच्या चमूस सहज मागे टाकले. यानंतर अनुष्काने २०० मीटर आणि ईराने उंच उडीत सुवर्णपदक मिळविले. अनुष्काने २७.५६ सेकंद अशी वेळ दिली; तर ईराने १.४५ मीटर उंची उडी मारली.

मुलांच्या गटातून प्राईज प्रशालेच्या सूरज अंकोलाने २०० मीटर शर्यत २३.६६ सेकंदात जिंकताना स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक पटकावले.

अन्य निकाल ः
१६ वर्षांखालील मुले थाळी फेक ः आकाश दुधाणे (क्रीडा प्रबोधिनी, ३९.२३मी.), साहिल हेंद्रे (क्रेस्ट इंग्लिश माध्य.), ऋषभ सुंदरजी (सेंट व्हिन्सेंट). उंच उडी (१.६५ मीटर) ः अभर दत्ता (हचिंग्ज प्रशाला), श्रेयस पाटिल (ज्ञानप्रबोधिनी, निगडी), अनिष कटारिया (सेंट व्हिन्सेंट), २०० मीटर (२३.६६ सेकंद) सूरज अंकोला (प्राईड इंग्लिश माध्यम), सागर शिंगाडे (भारतीय जैन संघटना), आर्यन फ्रान्सिस (जे. एन. पेटिट), १०० मीटर रिले (४७.९५ सेकंद) ः सेंट व्हिन्सेंट, भारतीय जैन संघटना, स्प्रिंग डेल, वडगाव)

मुली ः ८०० मीटर (२ः३८.६८ सेकंद) ः आकांक्षा गायकवाड (न्यू इंग्लिश स्कूल), अमिता परहाद (ज्ञानप्रबोधिनी, निगडी), युगंधरा गरवारे (हचिंग्ज प्रशाला) १०० मीटर रिले (५५.३५ सेकंद) अभिनव इंग्रजी माध्यम, विद्यानिकेतन इंग्लिश माध्यम, सिंहगड स्प्रिंग डेल, वडगाव), २०० मीटर (२७.५६ सेकंद) ः अनुष्का गुजर (अभिनव इंग्रजी माध्यम), रियासिंग ठाकूर (विद्यानिकेतन, पिंपरी), मुस्कान शेख (एरिन नगरवाला, कल्याणीनगर), उंच उडी (१.४५ मीटर) ः ईरा देवकुले (अभिनव इंग्रजी माध्यम), पूर्वा भोईटे (विद्यानिकेतन, पिंपरी), अवंतिका हेगडे (ज्ञानप्रबोधिनी, निगडी), थाळी फेक (२९.४५ मीटर) ः कनिष्का ढोले (मुक्तांगण), शाश्‍वती भोसले (सिंहगड सिटी, कोंढवा), केतकी चोपडे (विद्यानिकेतन, पिंपरी)

Web Title: Triple jump gold medal abhinav english medium school