अंतिम लढती गमावल्याचा त्रास होतो - पी. व्ही. सिंधू

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नान्जिंग/मुंबई - पी. व्ही. सिंधूला सलग दुसऱ्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार पत्करावी लागली. अंतिम लढत गमावत असल्याचा खूप त्रास होतो, दुःख होते, असे सिंधूने सांगितले. जागतिक स्पर्धेत पहिल्या गेममधील आघाडीनंतर सिंधूला हार पत्करावी लागली होती.

अंतिम फेरीत पराजित होत असल्याचे दुःख होते, त्रास होतो, असे सिंधूने सांगितले. लगेचच तिने अंतिम फेरी गाठल्याचा आनंद आहे. विजय आणि पराभव खेळाचाच भाग आहेत, असे सांगत स्वतःचे समाधान करून घेतले.

पहिल्या गेममधील पाच गुणांची दवडलेली आघाडी सिंधूला जास्त सलत होती. मी नक्कीच चांगला खेळ करायला हवा होता. पहिला गेम जिंकले असते, तर खूप काही वेगळे घडले असते. दुसऱ्या गेममध्ये खूपच चुका केल्या. स्मॅश बाहेरच जात होते, असे सिंधू म्हणाली. पहिल्या गेममध्ये माझ्या मोठ्या आघाडीनंतर मरिनने प्रतिकार सुरू केल्यावर मी संयम बाळगायला हवा होता, असेही तिने सांगितले. 
 
Web Title: Trouble of losing the game says P V sindhu