VIDEO : तांबेचा सुपर कॅच; जेम्स 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार

Kaushal Tambe brilliant catch James nervous ninety
Kaushal Tambe brilliant catch James nervous ninety Sakal

ICC Under 19 World Cup 2022 India U19 vs England U19, Final :अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना अँटिगा सर विवियन रिचर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर रंगला आहे. भारत (India U19 ) आणि इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी रंगलेल्या लढतीत इंग्लंड (England U19) संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय मध्यमगती गोलंदाज राज बावा आणि रवी कुमारच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव अवघ्या 189 धावांत आटोपला. या सामन्यात कौशल तांबेनं अप्रतिम झेल घेतल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सुरावातीपासून धक्क्यावर धक्के दिले. मात्र इंग्लंडच्या मध्यफळीतील जेम्स रीव (James Rew) यानं एकाकी किल्ला लढवत संघाचा डाव सावरला. त्याने आश्वसक अर्धशतकी खेळी केली. शतकाला अवघ्या पाच धावा कमी असताना तो बाद झाला. इंग्लंडच्या डावातील 44 व्या षटकात त्याने उत्तुंग फटका खेळला. डीपला फिल्डिंग करत असलेल्या कौशलनं आपल्यातील क्षेत्ररक्षणाचे कसब दाखवून देत अप्रतिम झेल घेत त्याला नर्व्हस नाईंटीवर बाद करण्यात मोलाचा वाटा उचलला. जेम्सनं 116 चेंडूचा सामना करत 12 चौकाराच्या मदतीने 95 धावा केल्या.

Kaushal Tambe brilliant catch James nervous ninety
U19 World Cup: कोण आहे राज बावा?; ज्यानं फायनलमध्ये केलीये हवा!

संघाला पहिले यश मिळवून देणाऱ्या रवी कुमारनं त्याची विकेट घेतली. रवीनं या सामन्यात 4 विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय राज बावा यानं इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला. सर्वात्तम झेल टिपणाऱ्या कौशक तांबने 5 षटके गोलंदाजीही केली. यात त्याने 29 धावा खर्च करुन एक विकेटही घेतली. एलेक्श हॉर्टनला त्याने कर्णधार यश धूल करवी झेलबाद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com