U19 World Cup 2024 : त्याचा शांत स्वभाव पाहता... अश्विनला उदय सहारनमध्ये दिसतो 'हा' स्टार भारतीय खेळाडू

U19 World Cup 2024 Uday Saharan : अश्विनला उदय सहारनचा एक गुण खूप भावला
U19 World Cup 2024 Captain Uday Sharan
U19 World Cup 2024 Captain Uday Sharanesakal

U19 World Cup 2024 Captain Uday Sharan : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने 19 वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनची स्तुती केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

उदय सहारनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवा संघाने सेमी फायनलमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. भारताची अवस्था 4 बाद 32 धावा अशी झाली असताना उदय सहारन आणि सचिन धस यांनी दमदार भागीदारी रचत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला होता.

U19 World Cup 2024 Captain Uday Sharan
Manoj Tiwari on Ranji Trophy : 'BCCI ने रणजी ट्रॉफी बंद केली पाहिजे...' क्रीडामंत्र्यांच्या वक्तव्याने उडाली खळबळ

दरम्यान रविचंद्रन अश्विनला कर्णधार उदय सहारनची ही खेळी चांगलीच भावली. त्याने उदय सहारनची तुलना भारतीय संघातील मॅच फिनिशरशी केली. अश्विन आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, 'अनेक लोकं यंदाच्या वर्ल्डकपमध्ये उदय सहारनच्या रूपाने भारताला पुढचा सुपर स्टार मिळाला अशी चर्चा करत आहेत.'

'तो पहिला कर्णधार आहे ज्याने स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. फक्त धावांचा विषय नाही तर त्याची सामना जिंकून देण्याची क्षमता मला जास्त बावली. त्याची शांत चित्ताने खेळ करण्याची वृत्ती जास्त प्रभावी आहे.'

'त्याच्या खेळ पाहताना त्याच्यामध्ये रिंकू सिंहची झलक दिसते. रिंकूसारखेच गुण त्याच्यामध्ये आहेत. तो संघाला आश्वस्त करतो. तो शांत स्वभावाचा आहे. त्याच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता नाही.'

U19 World Cup 2024 Captain Uday Sharan
Prithvi Shaw : 'टीम इंडियात पुनरागमन करण्यावर माझे लक्ष नाही...' शतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉचे धक्कादायक वक्तव्य

उदय सहारनने यंदाच्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपध्ये आतापर्यंत सहा सामन्यात 389 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ही 64.83 असून त्याने तीन अर्धशतकी आणि एक शतकी खेळी केली आहे.

सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सहारनने 81 धावांची दमदार खेळी केली. या खेळीमुळे भारताला विजय मिळवता आला. त्याने सचिन धससोबत 171 धावांची भागीदारी रचली. सचिन धसने देखील 95 चेंडूत 96 धावांची आक्रमक खेळी केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com