U-19 World Cup Indian Women
U-19 World Cup Indian Women

विजेच्या लपंडावामुळे इन्व्हर्टरवर सामना पाहण्याची वेळ; विश्‍वविजेत्या अर्चनाच्या कुटुंबाची अवस्था

वडिलांचे कर्करोगाने निधन

U-19 World Cup Indian Women : एकीकडे आपली कन्या दक्षिण आफ्रिकेत १९ वर्षांखालील महिलांच्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवत असताना येथे मायदेशात तिच्या कुटूंबाला आणि संपूर्ण गावाला सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. भारतीय संघाच्या अर्चना देवी हिची ही कथा.

U-19 World Cup Indian Women
IND vs NZ:''आमच्या खेळाडूंना धक्का बसला'' रांची व लखनौतील खेळपट्टीवर पांड्याची टीका

अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करणारी ऑफस्पिनर अर्चना देवी आणि तिचे कुटूंब रहात असलेल्या उत्तर प्रदेशमधील राताई पूर्वा गावाची ही कहाणी आहे. या गावात वीजेची मोठी अडचण आहे. सातत्याने वीज खंडीत होत असते. रविवारी झालेला अंतिम सामना वीजेच्या या परिस्थितीमुळे आपल्याला पाहता येणार नाही याचा अंदाज अर्चना देवीच्या कुटूंबाला होता. याची माहिती स्थानिक पोलिसाला मिळाली त्याने तातडीने इन्व्हर्टरची सोय केली. त्यामुळे कुटूंबासह संपूर्ण गावाला कोणत्याही व्यत्ययाविना अंतिम सामना आणि त्याचबरोबरच आपल्या लेकीचा खेळ पाहता आला.

U-19 World Cup Indian Women
Marnus Labuschagle : मार्नस लाबुशने भारत दौऱ्यावर किटबॅग भरून कॉफी का घेऊन येतोय?

राताई पूर्वा गे गाव उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या शहरापासून १०० किलोमीटर दूर आहे. तरीही तेथे अखंडीत वीज मिळणे कठीण आहे. इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना पाहण्यासाठी अर्चना देवीच्या घरी सर्वांनी गर्दी केली होती. हा अंतिम सामना सुरु असताना कधीही वीज जाण्याची भीती सर्वांना होती. त्यामुळे आपल्या बहिणीचा खेळ व्यवस्थितपणे पाहता येणार नाही. पण एका पोलिस कर्मचाऱ्याला परिस्थिती लक्षात आल्यावर त्याने इन्व्हर्टर आणि बॅटरीची व्यवस्था केली. त्यामुळे आम्ही टीव्हीवर सामना पाहू शकलो अशी माहिती अर्चनाचा भाऊ रोहितने दिली.

वडिलांचे कर्करोगाने निधन

अर्चना गोलंदाजासह एक चपळ क्षेत्ररक्षकही आहे. अर्चनाने दोन विकेट तर मिळवलेच पण त्याबरोबर तिन हवेत सूर मारून एका हातात जमिनीलगत घेतलेला झेल फारच लक्षवेधक ठरला. अर्चनाच्या वडिलांचे २००८ मध्ये कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर अर्चनाचा आणखी एक भाऊ त्याचे निधन साप चावल्यामुळे झाले त्यानंतरही आपण तिची क्रिकेट खेळण्याची आवड कायम ठेवली. तिला सातत्याने प्रोत्साहन दिले, असे अर्चनाच्या आईने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com