
Marnus Labuschagle : मार्नस लाबुशने भारत दौऱ्यावर किटबॅग भरून कॉफी का घेऊन येतोय?
Marnus Labuschagle Coffee : ऑस्ट्रेलियाचा संघ बॉर्डर - गावसकर कसोटी मालिका आणि वनडे मालिका खेळण्यासाठी भारतात दाखल होतोय. चार सामन्यांची कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबुशने याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोबाबत क्रिकेट चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ भारतात 1 फेब्रुवारीला दाखल होत आहे. या प्रवासासाठी मार्नस लाबुशने जय्यत तयारी करत आहे. याबाबतचा फोटो त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरू शेअर केला. या फोटोत तो आपल्या किटबॅगमध्ये मोठमोठे कॉफीचे पॅकेट्स ठेवताना दिसतोय. या फोटोला लाबुशनेने 'भारतात जाताना काही किलो कॉफीचे पॅकेट्स, किती पॅकेट्स आहेत अंदाज लावा.' असे कॅप्शन दिले.
यावर भारताचा विकेटकिपर फलंदाज आणि समालोचक दिनेश कार्तिकने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, 'मार्नस भावा तुला भारतात देखील चांगली कॉफी मिळेल.'
मार्नसच्या किटबॅगमधील कॉफीची मोठमोठी पॅकेट्स पाहून मार्नस कॉफीचा चांगलाच शौकीन दिसतोय. यामुळेच तो भारत दौऱ्यावर बॅग भरून कॉफी आणत आहे.
मार्नस सध्या बीग बॅश लीग खेळण्यात व्यग्र होता. त्याने आपला शेवटच्या दोन डावात 96 धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिका आणि वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेत देखील दमदार कामगिरी केली होती.
भारताविरूद्धचा ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), एश्टर एगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जॉश हेजलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशने, नॅथन लिओन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेस स्टार्क, मिशेत स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल