Umpire Salary : OMG! क्रिकेटर्सपेक्षा जास्त कमावतात अंपायर! जाणून घ्या, किती असतो यांचा पगार?

तुम्हाला माहिती आहे का अनेकदा क्रिकेटर्सच्या सॅलरीपेक्षा अंपायरची सॅलरी अधिक असते.
umpire salary
umpire salarysakal

Umpire Salary : इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा क्रिकेटप्रेमींसाठी खुप मोठा उत्सव असतो. 2008 मध्ये पहिल्यांदा आयपीएलची सुरवात झाली होती. इंडियन प्रीमियर लीग बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट यांच्या द्वारे संचालित करणारी Twenty20 क्रिकेट लीग आहे.

आयपीएल (Indian Premier League) दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खेळली जातात. आयपीएलमध्ये सध्या दहा टीम खेळत आहे.

आयपीएल सुरू झाले की क्रिकेटर्सची जोरदार चर्चा सुरू होते पण या सोबतच अंपायचीही तितकीच चर्चा असते. मुळात आपण सहसा क्रिकेटर्सच्या सॅलरी किती असावी याचा विचार करतो. तुम्हाला माहिती आहे का अनेकदा क्रिकेटर्सच्या सॅलरीपेक्षा अंपायरची सॅलरी अधित असते.

या आयपीएल सीजनमध्ये 74 मॅच खेळले जाणार. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की अंपायरला प्रत्येकी मॅचनुसार सॅलरी दिली जाते की सीजननुसार...

umpire salary
Umpire Marais Erasmus Video : मी पाहिलंच नाही! अंपायर इरासमुस यांनी केली मोठी चूक; चक्क पाठ फिरवली

अंपायरला दोन कॅटेगरीमध्ये सॅलरी मिळते

आयपीएल सीजनमध्ये क्रिकेटर्स कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. मात्र अंपायरसुद्धा कुठे कमी नाही.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंपायरची सॅलरीला दोन कॅटेगरीमध्ये विभागतात.

पहिल्या कॅटेगरीमध्ये ICC च्या एलीट पॅनलमध्ये सहभागी असणारे अंपायर असतात तर दुसऱ्या श्रेणीत अंपायरला प्रत्येक IPL मॅच मध्ये अंपायरिंग करण्यासाठी 1.98 लाख रुपये दिले जातात. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये डेव्हलपमेंट अंपायर असतात. ज्यामध्ये प्रत्येक मॅचचे 59 हजार रुपये दिले जातात.

umpire salary
Cricket Australia : पैसा बोलता हैं! IPL फ्रेंचायजींमुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया 'हे' स्टार खेळाडू कायमचे गमावणार?

ब्रांडपासूनही कमावतात अंपायर
रिपोर्ट्सनुसार एक अंपायर जवळपास 20 मॅचमध्ये अंपायरिंग करतो. यानुसार आयपीएलच्या एका सीजनमधून ते जवळपास 40 लाख रुपयांची कमाई करतात. याशिवाय अंपायरच्या ड्रेसवर स्पॉन्सरशिप लोगोसाठी त्यांना पैसे दिले जातात. याची किंमतही 7.30 लाख रुपये असते.

काही क्रिकेटर्सपेक्षा जास्त कमाई

आयपीएल 2023 साठी क्रिकेटर्सचा बेस प्राइस 20 लाख रुपये आहे. जर कोणी फ्रेंचायजी भारताच्या कोणत्याही डोमेस्टिक खेळाडूला आपल्या टीममध्ये सहभागी करुन घेत असेल तर कमीत कमी 20 लाख रुपये देतात. अंपायर एक सीजन मध्ये 40 लाख रुपये घेतो. या तुलनेत ते काही क्रिकेटर्सपेक्षा जास्त कमवतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com