IPLने नाकारलेला उन्मुक्त चंद BBL खेळणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Unmukt Chand first Indian player to play in the BBL
Unmukt Chand first Indian player to play in the BBLesakal

मेलबर्न : भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदकडे (Unmukt Chand) भविष्यातील विराट कोहली म्हणून पाहिले जात होते. मात्र उन्मुक्त चंदला फारशी चकम दाखवता आली नाही. त्याला आयपीएलमध्येही फार काही जास्त मजल मारता आली नव्हती. दरम्यान, उन्मुक्त चंदने (Unmukt Chand) अमेरिकेचा रस्ता धरला. आता तो ऑस्ट्रेलियाच्या बीग बॅश लीगमध्येही (Big Bash League ) चमकणार आहे. बीग बॅशमध्ये खेळणारा उन्मुक्त चंद हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. (Unmukt Chand first Indian player to play in the Big Bash League)

Unmukt Chand first Indian player to play in the BBL
Video: पोलिसांनी पोस्ट अ‍ॅशेस पार्टी केली बंद

उन्मुक्त चंदने मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) कडून खेळताना हॉबर्ट हरिकेन्सविरुद्ध (Hobart Hurricanes) आपले बीबीएल (BBL) पदार्पण केले. चंद हा आता 28 वर्षांचा आहे. त्याने जवळपास एक दशक देशांतर्गत क्रिकेट (Domestic Cricket) खेळला आहे. त्याने 67 प्रथम श्रेणी सामने खेळले. याचबरोबर तो आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला. मात्र त्याने गेल्या वर्षी त्याने अमेरिकेत आपले नशीब आजमावण्यासाठी देश सोडला.

Unmukt Chand first Indian player to play in the BBL
मोहम्मद सिराजची विराटबद्दल भावून पोस्ट

उन्मुक्त चंद 2012 मध्येच आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलाच प्रसिद्ध झाला होता. त्याने ऑस्ट्रेलियात (Australia) खेळल्या गेलेल्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्याने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 111 धावांची नाबाद खेळी करुन भारताला विजेतेपद मिळवून दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com